Wed, Nov 21, 2018 23:28होमपेज › Kolhapur › दोन मोटारसायकलींची धडक; एक जण ठार

दोन मोटारसायकलींची धडक; एक जण ठार

Published On: May 25 2018 1:09AM | Last Updated: May 25 2018 12:15AMकोल्हापूर : प्रतिनिधी

निगवे खालसा (ता. करवीर) फाट्यावर दुचाकींची रात्री आठ वाजता समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला. तर दोन मुलांसह पाच जण जखमी झाले. सुरेश रामबीरसिंग कश्यप (38, रा. सदर बाजार) असे मृताचे नाव आहे.

सुरेश कश्यप हे पत्नी संगीता (वय 32), मुलगा सचिन (13) व पुतण्या मनसू (5) यांना घेऊन गारगोटीहून कोल्हापूरकडे परतत होते. निगवे खालसा गावानजीक राधानगरीकडे निघालेल्या सागर रामचंद्र पाटील (30, रा. मालवे) याच्या मोटारसायकलीशी समोरासमोर धडक झाली. सागरच्या पाठीमागे बसलेला सूरज शिवाजी सुतार (23, रा. कपिलेश्‍वर) जखमी झाला. कश्यपच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच तो ठार झाला. कश्यप कुटुंबीय मूळचे दिल्‍लीचे राहणारे असून, गेली दहा वर्षे कोल्हापुरात मिठाई बनविण्याचा व्यवसाय करतात.