Sun, May 26, 2019 08:33होमपेज › Kolhapur › अतिग्रेत दोन गटांत हाणामारी; सात जखमी

अतिग्रेत दोन गटांत हाणामारी; सात जखमी

Published On: Apr 13 2018 1:17AM | Last Updated: Apr 13 2018 12:32AMहातकणंगले : प्रतिनिधी

अतिग्रे येथे जमीन वादातून दोन गटांत झालेल्या हाणामारीत सातजण जखमी झाले. दोन्ही गटांकडून काठ्या, लोखंडी पाईपचा वापर झाला. बुधवारी रात्री ही घटना घडली.यामध्ये प्रवीण बिडकर, शिवाजी बिडकर, महेश बिडकर, सुरेश बिडकर, मधुकर बिडकर, सतीश बिडकर व श्रीकांत बिडकर जखमी झाले आहेत.  दोन्ही गटाकडून  परस्परविरोधी    फिर्यादी हातकणंगले पालिसांत दाखल आहेत. कै. यशवंत बिडकर यांच्या नावावर जमिनीचा सातबारा आहे. त्यांचा भाऊ बापूही मयत आहेत; परंतु मयत बंधूचे नातू जमिनीवर हक्‍क दाखवत आहेत. यावरूनच पुन्हा वाद झाला व वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. यामध्ये शिवाजी यांच्या घरात घुसून मारहाण केली, तर दोन्ही गटांतील लोकांनी हाणामारी केली.

Tags : Kolhapur, Two, groups, clash, Seven, injured