होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : टाकाळ्यात दोन फ्लॅट चोरट्यांनी फोडले

कोल्हापूर : टाकाळ्यात दोन फ्लॅट चोरट्यांनी फोडले

Published On: Jun 13 2019 1:02PM | Last Updated: Jun 13 2019 1:02PM
कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापुरातील टाकाळा येथील शिवशक्ती टेरेसमधील दोन बंद फ्लॅट चोरट्यांनी काल मध्यरात्री फोडले. यामध्ये प्रशांत केखलेकर यांच्या घरातून पाच तोळे दागिने व रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. तर प्रशांत यांच्याच अपार्टमेंटमधील शेजारी राहणाऱ्या वंदना शेरखाने यांचाही फ्लॅट चोरट्यांनी फोडला आहे.

कोल्हापूर शहरात चोरीचे प्रकार सुरूच आहेत. एकामागून एक अशा चोरीच्या घटना समोर येत आहे.