Sun, Aug 18, 2019 15:11होमपेज › Kolhapur › सांडपाणी प्रकल्पासाठी दोन एकर जागेस मंजुरी 

सांडपाणी प्रकल्पासाठी दोन एकर जागेस मंजुरी 

Published On: Dec 15 2017 2:44AM | Last Updated: Dec 15 2017 2:18AM

बुकमार्क करा

शिरोळ : प्रतिनिधी

शिरोळ गावची सन 2040 लोकसंख्या गृहीत धरून शिरोळमधील सांडपाण्याचा  निचरा होण्यासाठी शासनाने शिरोळ ग्रामपंचायतीच्या वतीने राबविण्यात येण्यार्‍या सांडपाणी प्रकिया प्रकल्प उभारणीसाठी 2 एकर जागेस मंजुरी दिल्याची माहिती उपसरंपच पृथ्वीराज यादव यांनी पत्रकार बैठकीत दिली. प्रकल्प मंजुरीनुसार जिरगे पेट्रोल पंप ते दसरा चौक, नंदीवाले वसाहत ते जनता हायस्कूलपर्यंतच्या भुयारी गटारीचा सर्वे लवकरच करण्यात येणार आहे. 

शासन नियमानुसार या जागेची किंमत सुमारे 1 कोटी आहे. नाबार्ड अर्थसाहाय्यातून हा प्रकल्प पूर्णत्वास येणार असून सुमारे 10 ते 12 कोटीचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात येणार आहे. शिरोळची वाटचाल शहराच्या दिशेने होत आहे. यामध्ये 30 टक्के गावठाण व  70 टक्के वाढीव उपनगरांचा समावेश आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक उत्पन्न असणारी दुसर्‍या कमाकांची ग्रामपंचायत आहे. परिणामी या शहरांतील वाढती लोकसंख्या गृहित धरून 16 हजार नागरिकांना सांडपाणी निचरा व्यवस्थापनाचा  प्रश्‍न भेडसावत आहे.

हा प्रकल्प उभारणीसाठी 2 एकर जागेची आवश्यकता असल्याने ग्रामपंचायतीने गट नं.1042/1 मधील 2 एकर जागेत प्रकल्प उभारणी प्रस्ताव  दिला होता. शासनाकडे  पाठपुरावा करून हा प्रकल्प मंजुर करून घेतला. याकामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, भाजपा तालुका नेते अनिलराव यादव, पुणे विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांचे सहकार्य मिळाल्याचे यादव म्हणाले.