Sun, Nov 18, 2018 10:13होमपेज › Kolhapur › कोल्हापूरला ‘स्मार्ट सिटी’ बनविण्यासाठी प्रयत्न

कोल्हापूरला ‘स्मार्ट सिटी’ बनविण्यासाठी प्रयत्न

Published On: Dec 16 2017 2:06AM | Last Updated: Dec 16 2017 12:00AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

महापालिका अधिकारी व कर्मचार्‍यांनी प्रामाणिकपणे कष्ट करून कोल्हापूर शहराला स्मार्ट सिटी बनविण्यासाठी प्रयत्न करावेत. त्यामुळे लोकप्रतिनिधीसह अधिकारी व कर्मचार्‍यांचीही प्रतिमा उंचावेल, असे प्रतिपादन स्थायी समिती सभापती संदीप नेजदार यांनी केले. महापालिकेच्या 45 व्या वर्धापन दिनानिमित्त कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात स्थायी समिती सभापती नेजदार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

यावेळी महापालिकेच्या वतीने वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी यांचा सत्कार करण्यात आला. सत्कार झालेल्यांची नावे अशी, कंसात शहीद जवानांची नावे - श्रीमती उर्मिला मरळे (निवृत्ती मरळे), सुनील कांबळे (सात्ताप्पा कांबळे), श्रीमती सुलोचना रावराणे (लक्ष्मण रावराणे), श्रीमती कांचनदेवी भोसले (जयसिंग भोसले), सौ.माणिक वालकर (कॅप्टन शंकर वालकर), श्रीमती सुनीता देसाई (मेजर मच्छिंद्र देसाई), श्रीमती आनंदी उलपे (दिगंबर उलपे), श्रीमती मनीषा सूर्यवंशी (अभिजित सूर्यवंशी), व्यंकोजी शिंदे (मेजर सत्यजित शिंदे), शांता चिले (सुनील चिले), मनीषा जाधव (भगवान जाधव), श्रीमती पार्वतीबाई माने (अशोक माने), श्रीमती अंजनी पाटील (श्रीकांत पाटील).

यावेळी ताराराणी आघाडी गटनेता सत्यजित कदम, भाजप गटनेता विजय सूर्यवंशी, राष्ट्रवादी गटनेता सुनील पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती वहिदा सौदागर आदी उपस्थित होते. 

कर्मचार्‍यांतर्फे स्मशानभूमीस 40 हजार शेणी प्रदान

महापालिका कर्मचार्‍यांच्या वतीने 40 हजार शेणी पंचगंगा स्मशानभूमीस प्रदान करण्यात आल्या. शहर अभियंता सरनोबत यांच्या हस्ते स्थायी सभापती नेजदार यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. महापालिका कर्मचार्‍यांकडून गेली 5 वर्षे पंचगंगा स्मशानभूमीस शेणी प्रदान करण्याचा उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत प्रथम वर्षी 10 हजार शेणी, दुसर्‍या वर्षी 20 हजार शेणी, तिसर्‍या वर्षी 30 हजार, फायर एक्स्टयुगेशर व भिंतीवरील मोठे घड्याळ व चौथ्या वर्षी 30 हजार शेणी व यावर्षी 40 हजार शेणी प्रदान करण्यात आल्या.