Sun, Apr 21, 2019 01:51होमपेज › Kolhapur › शहराला निधी मिळण्यासाठी प्रयत्न करू : पालकमंत्री

शहराला निधी मिळण्यासाठी प्रयत्न करू : पालकमंत्री

Published On: Jan 16 2018 2:10AM | Last Updated: Jan 15 2018 10:46PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर शहराच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून निधी मिळविण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिली. 

महापालिकेतील भाजप-ताराराणी आघाडी नगरसेवकांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री पाटील यांनी कोल्हापूर उत्तर व आमदार अमल महाडिक यांनी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील नगरसेवकांना प्रत्येकी पाच लाखांचा निधी दिल्याचे नगरसेवकांनी सांगितले. 

महापालिकेच्या महासभेपूर्वी पार्टी मिटिंग घ्यावी. त्याद्वारे नगरसेवकांत ताळमेळ ठेवावा. महापालिकेतील कोणत्याही आर्थिक व्यवहारात पक्षातील नगरसेवकांची नावे येऊन बदनामी होऊ नये, याची दक्षता घ्यावी. 

शहरातील झोपडपट्टीसह इतर प्रश्‍न सोडविण्यासाठी प्राधान्य द्यावे. महासभेत विकासकामांसाठी आग्रही राहा, असा सल्लाही यावेळी पालकमंत्री पाटील यांनी नगरसेवकांना दिला. यावेळी आ. अमल महाडिक यांच्यासह ताराराणी आघाडी गटनेता सत्यजित कदम, भाजप गटनेता विजय सूर्यवंशी यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.