Sat, Jul 20, 2019 08:56होमपेज › Kolhapur › शिरोळमध्ये ट्रकची धडकबसून वृद्ध शेतकरी ठार

शिरोळमध्ये ट्रकची धडकबसून वृद्ध शेतकरी ठार

Published On: Feb 18 2018 1:58AM | Last Updated: Feb 18 2018 1:58AMशिरोळ : प्रतिनिधी

मालवाहू ट्रकने ठोकरल्याने वृद्ध शेतकरी ठार झाला. पद्माराजे विद्यालयासमोर एकेरी रस्त्यावर हा अपघात झाला. दत्तात्रय ईश्‍वरा काळे (वय 71, रा. काळे गल्ली) असे मृत झालेल्या शेतकर्‍याचे नाव आहे.

घटनेनंतर संतप्त जमावाने ट्रकवर जोरदार दगडफेक करून काचा फोडल्या. ट्रकचालकाला बेदम चोप दिला. फक्रुद्दीन कमरू मेवाती असे त्याचे नाव आहे. शिरोळ पोलिसांनी चालकाला अटक केली आहे.

अर्जुनवाड रोड चौक ते जयसिंगपूरला जोडणार्‍या मुख्य रस्त्याकडे ट्रक येत होता. याचवेळी काळे सायकलवरून शेताकडे जात होते. समोरून आलेल्या ट्रकने त्यांना ठोकरले. ट्रकच्या मागील चाकात सापडून त्यांचा जागीच मृत्यू झाला.

रस्त्याची दुरुस्ती कधी..?

अपघात झाला तो रस्ता वादग्रस्त बनल्याने त्याची दुरवस्था झाली आहे. अनेक वर्षे डांबरीकरण झालेले नाही. साधे पॅचवर्कही नाही. रस्त्यावर मोठे खड्डे पडले आहेत. वाहतुकीचा मुख्य रस्ता असूनसुद्धा याकडे बांधकाम खात्याचे दुर्लक्ष आहे. आज एकाच दिवशी तीन अपघात होऊन एकाचा जीव गेला. शासनाने आतातरी डोळे उघडावेत, अशीही मागणी होत आहे.