Tue, Jan 22, 2019 09:52होमपेज › Kolhapur › कोल्हापूर विमानतळाला मिळाला वाहतूक परवाना

कोल्हापूर विमानतळाला मिळाला वाहतूक परवाना

Published On: Dec 16 2017 2:06AM | Last Updated: Dec 16 2017 2:06AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर विमानतळाला प्रवासी विमान वाहतुकीसाठी आवश्यक असलेला ‘2-बी’ डे ऑपरेटिंग परवाना शुक्रवारी सायंकाळी मिळाला. हा परवाना दि. 16 पर्यंत मिळेल, अशी शक्यता होती. त्यापूर्वीच आज हा परवाना मिळाल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील व खा. धनंजय महाडिक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

कोल्हापूर-मुंबई विमानसेवेला दि. 24 पासून प्रारंभ होत आहे. आठवड्यातून तीन दिवस ही विमानसेवा सुरू राहणार आहे. याकरिता दि. 20 रोजी पूर्वचाचणी घेतली जाणार आहे. या सर्व पार्श्‍वभूमीवर ‘2-बी’ हा परवाना मिळाला असल्याची माहिती नागरी हवाई वाहतूक संचालनालयाचे बी. एस. भुल्लर यांनी दिल्याचेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.

या परवान्याची प्रत भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या दिल्ली येथील सेंट्रल हेडक्वॉर्टर येथे पाठवण्यात आली आहे. यामुळे डे ऑपरेशन्स निर्धारित वेळेत सुरू होणार, हे स्पष्ट झाले आहे. हा परवाना मिळवण्यासाठी कोल्हापूर विमानतळाच्या अधिकारी पूजा मूल यांच्यासह अधिकार्‍यांनी विशेष प्रयत्न केल्याचेही या पत्रकात म्हटले आहे.