Tue, Jul 16, 2019 09:48होमपेज › Kolhapur › प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा बेमुद संप

प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा बेमुद संप

Published On: Jun 15 2018 1:05AM | Last Updated: Jun 14 2018 11:16PMकोल्हापूर : प्रतिनिधी

शासनाकडून मिळणार्‍या विद्यावेतनात वाढ मिळावी, या मागणीसाठी राज्यातील प्रशिक्षणार्थी डॉक्टर बेमुदत संपावर गेले आहेत. या संपात राज्यातील सुमारे 2 हजार प्रशिक्षणार्थी डॉक्टरांचा समावेश आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील 130 डॉक्टर यामध्ये सहभागी झाले आहेत. 

प्रतिमहिना मिळणार्‍या विद्यावेतनात वाढ व्हावी, या मागणीसाठी वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांच्या समवेत यापूर्वी तीन बैठका झाल्या आहेत.परंतू निर्णय न झाल्याने 26 मार्च 2018 रोजी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या वतीने काळ्या फिती बांधून कँडल मार्च मोर्चा काढला होता.यानंतर त्वरीत मंत्रीमहोदयांनी बैठक घेऊन सर्व मागण्या मान्य केल्याने हे आंदोलन स्थगित केले होते.

शासनानेही विद्यावेतन वाढीच्या निर्णयाविषयी 40 दिवसांची मुदत मागितली होती. परंतू अद्याप प्रशिक्षणार्थी डॉक्टरांची मागणी पूर्ण न झाल्याने मंगळवारी पुन्हा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन व  वैद्यकीय शिक्षण संशोधन सह संचालक डॉ. तात्याराव लहाने यांच्या सोबत शिष्टमंडळाची बैठक झाली. पण लेखी ग्वाही देण्यास नकार न दिल्यामुळे प्रशिक्षणार्थी डॉक्टरांनी बेमुदत संप पुकारला आहे. सध्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरांना विद्यावेतन 6 हजार रूपये आहे. 15 हजार रूपये इतके वेतन करावी, अशी डॉक्टरांची मागणी आहे.