Wed, Mar 27, 2019 06:25होमपेज › Kolhapur › पर्यटक, भाविकांची कोल्हापुरात गर्दी

पर्यटक, भाविकांची कोल्हापुरात गर्दी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

सलग सुट्ट्या तसेच दहावी, बारावीच्या परीक्षांसह इतर कॉलेजच्या परीक्षा संपल्यामुळे शहरात पर्यटक भाविकांची गर्दी होत आहे. जोतिबा यात्रेसाठी राज्यभरातून आलेल्या भाविकांनी श्री अंबाबाई देवीच्या दर्शनासाठी रविवारी (दि. 1) मोठी रांग लावली होती. शहरालगतच्या पर्यटनस्थळांवर पर्यटक, भाविकांचा ओघ दिवसेंदिवस वाढत आहे. न्यू पॅलेस, रंकाळा, कणेरीमठ, पन्हाळा, खिद्रापूर आदी ठिकाणीही पर्यटकांची मोठी गर्दी दिसून आली. पर्यटकांच्या वाहनांमुळे शहरात दिवसभर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

धार्मिक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक वारसा लाभलेल्या कोल्ल्हापुरात पर्यटक भाविकांची गर्दी दिवसेंदिवस वाढते आहे. अनेक कुटुंबांनी या सलग सुट्ट्यांची पर्वणी साधत पर्यटनाचा आनंद घेतला. मुंबई, पुणे, बंगळूर, दिल्ली, आंध्रप्रदेश तामिळनाडू, राजस्थान, गोवा असे अनेक भागातून पर्यटक कोल्हापुरात आल्याचे दिसून आले. पर्यटक आणि भाविकांनी कोल्हापूरचे वैशिष्ट्ये असणार्‍या गूळ, चटणी, फेटा, कोल्हापुरी चप्पल, साज या वस्तूंचीही खरेदी केली .

भाविक मंडपाच्या सावलीत
कडाक्याच्या उन्हात अंगावरून घामा धारा झेलत श्री अंबाबाईच्या दर्शनासाठी तासन्तास ताटकळत बसलेल्या भाविकांनी मंडपाचा आधार घेतला. देवीच्या दर्शनानंतर अनेकांनी या सावलीत दोन घास खात थोडा वेळ आराम करत पुढचा प्रवास सुरू केला. 
 

Tags : Kolhapur city, Tourist, devotees 


  •