Thu, Aug 22, 2019 12:29होमपेज › Kolhapur › मराठा आरक्षणासाठी उद्या कसबा बावडा बंद

मराठा आरक्षणासाठी उद्या कसबा बावडा बंद

Published On: Jul 26 2018 1:33AM | Last Updated: Jul 26 2018 12:07AMकसबा बावडा : प्रतिनिधी

राज्यभर सुरू असलेल्या मराठा क्रांती आंदोलनाचे लोन सर्वत्र पसरत आहे. कसबा बावडा, लाईन बाजार येथील सर्व व्यवहार शुक्रवारी बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा देण्याचा निर्णय ज्ञानेश्‍वर महाराज मंडप येथे झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला.

बुधवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत आंदोलनादरम्यान प्राण गमावलेल्या मराठा क्रांतीच्या कार्यकर्त्याला श्रद्धांजली वाहण्यात आली. बैठकीत विविध वक्त्यांनी मनोगत व्यक्‍त केले. कसबा बावड्यातील सर्व व्यवहार शुक्रवारी बंद ठेवून सक्रिय पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला. शुक्रवारी लाईन बाजार, कसबा बावडा मुख्य मार्गावरून फेरी काढण्याचा निर्णयही घेण्यात आला. सकाळी नऊ वाजता भगवा चौक येथून फेरीला सुरुवात होईल.शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत सर्व व्यवहार बंद ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. यावेळी माजी नगरसेवकर अजित पोवार, नगरसेवक मोहन सालपे, प्रदीप उलपे, हरी पाटील, सचिन नामदेव पाटील, प्रा. एन. टी. पाटील, अजित पाटील, तानाजी चव्हाण आदी उपस्थित होते.