Thu, Apr 25, 2019 05:27होमपेज › Kolhapur › ‘पुढारी’चा आज वर्धापनदिन; स्नेहमेळाव्याचे आयोजन

‘पुढारी’चा आज वर्धापनदिन; स्नेहमेळाव्याचे आयोजन

Published On: Jan 01 2018 1:55AM | Last Updated: Jan 01 2018 1:55AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

वाचकांशी जिव्हाळा आणि आपुलकीचे नाते गेली 79 वर्षे अविरतपणे जपणार्‍या दैनिक ‘पुढारी’चा वर्धापनदिन सोमवार, दि. 1 जानेवारी रोजी साजरा होत आहे. नि:पक्ष, निर्भीड विचारांची अमृतमहोत्सवी वाटचाल करणारा दैनिक ‘पुढारी’ सोमवारी 80 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. यानिमित्त ‘पुढारी’ मुख्य कार्यालयासमोरील टाऊन हॉल बागेत सायंकाळी 6 ते 9 या वेळेत स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. वर्धापनदिनानिमित्त विविध उपक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन ‘पुढारी’ परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

समाजहिताचा अखंड वसा जपत, सामाजिक  बांधिलकी जोपासणार्‍या दैनिक ‘पुढारी’चा 79 वा वर्धापनदिन सोहळा साजरा होत आहे. समाजहितासाठी सदैव अग्रभागी असणार्‍या ‘पुढारी’ने गेल्या 79 वर्षांत वाचकांशी आपुलकीचे नाते जोडले आहे. प्रत्येक जनमाणसाशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याची ही वीण आणखी घट्ट करणारा हा वर्धापनदिन सोहळा म्हणजे वाचक, नागरिकांचा कौटुंबिक सोहळा आहे. 

या सोहळ्यासाठी ‘पुढारी’ भवन आणि टाऊन हॉल उद्यानाला नेत्रदीपक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या रोषणाईने टाऊन हॉल बागेचे सौंदर्य आणखी खुलून गेले आहे. शहरासह जिल्ह्यातील विविध सामाजिक, राजकीय संस्था, संघटना, सार्वजनिक तालीम संस्था, तरुण मंडळांच्या वतीने  दैनिक ‘पुढारी’च्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा देणारे फलक ठिकठिकाणी लावण्यात आले आहेत.

विविध उपक्रमांचे आयोजन

दैनिक ‘पुढारी’च्या वर्धापनदिनानिमित्त विविध संस्था, संघटनांतर्फे सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले आहे. अ‍ॅमॅच्युअर कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रोलर असोसिएशनच्या शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे स्केटिंग स्कूल व स्टार रोलर स्केटिंग असोसिएशनतर्फे स्केटिंग रॅली काढण्यात येणार आहे. शहराच्या प्रमुख मार्गांवरून निघणार्‍या या रॅलीत 100 हून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. या रॅलीत विविध संदेश देत हे खेळाडू प्रबोधन करणार आहेत. ‘पुढारी’ भवन येथे रॅलीची सांगता होणार आहे.