Fri, Nov 16, 2018 23:45होमपेज › Kolhapur › नव्या आराखड्याचे आज सादरीकरण

नव्या आराखड्याचे आज सादरीकरण

Published On: Jun 13 2018 1:33AM | Last Updated: Jun 13 2018 1:17AMकोल्हापूर : प्रतिनिधी

पर्यायी पुलासाठी पाया लागत नसल्याने ‘पिलर’साठी नवा आराखडा (डिझाईन) तयार करण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने बुधवारी ते मुंबईतील मुख्य कार्यालयात मंजुरीसाठी दाखल केले जाणार आहे. दरम्यान, आज दिवसभर काम बंद ठेवण्यात आले होते. नव्या डिझाईनला मंजुरी मिळाल्यानंतरच थांबवलेले काम पुन्हा सुरू केले जाणार आहे.

पर्यायी पुलासाठी पिलर काढण्यात येणार आहे. त्याकरिता खोदकाम सुरू आहे. मात्र, सुमारे 35 फूट खोल खोदकाम करूनही ठणक दगड लागलेला नाही. तिन्ही बाजूला दगड आणि एका बाजूला माती यामुळे पाया लागलेला नाही. नदीपात्रापर्यंत खोदकाम गेल्याने पिलरचे डिझाईन बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार खोदकाम केलेल्या परिसराची मोजणी करण्यात आली. त्यानुसार नवा आराखडा तयार करण्यात आला आहे. बुधवारी मुंबईत तो सादर केला जाणार आहे.

दरम्यान, पुरातत्त्व विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयाकडून अद्याप ना-हरकत प्रमाणपत्र प्राप्त झालेले नाही. खोदकाम सुरू असलेली जागा पुरातत्त्वच्या नियमानुसार 100 मीटर पेक्षा अधिक अंतरावर असल्याचे स्पष्ट झाले आहे, त्यानुसार राष्ट्रीय स्मारके प्राधिकरणाच्या बैठकीत त्याला मंजुरीही दिली आहे. त्याचे इतिवृत्त प्राप्त झाले आहे. यामुळे प्रलबिंत ना-हरकत पत्राचा कामावर परिणाम होणार नाही, नवीन आराखडा मंजूर झाल्यानंतर काम सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले.