होमपेज › Kolhapur › विमानतळ समितीची आज बैठक

विमानतळ समितीची आज बैठक

Published On: Jul 17 2018 1:34AM | Last Updated: Jul 17 2018 12:12AMकोल्हापूर (प्रतिनिधी) : कोल्हापूर विमानतळ समितीची मंगळवारी बैठक होणार आहे. सायंकाळी 4 वाजता कोल्हापूर विमानतळावर जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. विमानतळ विस्तारीकरण, सुरक्षा आदींसह विविध बाबींवर बैठकीत चर्चा होणार आहे. कोल्हापूर-तिरूपती, हैदराबाद मार्गावर सप्टेंबरपासून नव्या सेवा सुरू होत आहेत. या पार्श्‍वभूमीवरही संबंधित कंपनीला प्रवाशांसाठी आवश्यक सुविधा देण्याबाबतही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.