Mon, Apr 22, 2019 03:59होमपेज › Kolhapur › खासदारकी टिकवण्यासाठी ‘त्यांचे’ काँग्रेस-राष्ट्रवादी नेत्यांच्या गळ्यात गळे  

खासदारकी टिकवण्यासाठी ‘त्यांचे’ गळ्यात गळे  

Published On: Apr 27 2018 12:44AM | Last Updated: Apr 27 2018 12:44AMकुरुंदवाड : प्रतिनिधी

आपल्या न्यायहक्‍काच्या मागणीसाठी रस्त्यावर उतरणार्‍या शेतकर्‍यांना काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारने गोळ्या घालून ठार केले. शेतकर्‍यांच्या रक्‍ताने हात माखलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत आपली खासदारकी टिकवण्यासाठी शेतकर्‍यांचे नेते म्हणविणारे गळ्यात गळे घालत आहेत, असा टोला खा. राजू शेट्टी यांचे नाव न घेता कृषी पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी लगावला.अब्दुललाट (ता.शिरोळ) येथील कल्लेश्‍वर मंदिरमध्ये महाराष्ट्र राज्य कृषी विभाग व गुरुदत्त शुगर्स टाकळीवाडी यांच्या संयुक्‍त विद्यमाने शिरोळ तालुका क्षारपडमुक्‍ती पायलट प्रोजेक्टच्या प्रारंभ प्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी गुरुदत्त शुगर्सचे चेअरमन माधवराव घाटगे, भाजपा तालुका नेते अनिलराव यादव, गुरुदत्तचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर राहुल घाटगे,  जि. प. सदस्य अशोकराव माने,  विठ्ठलराव नाईक-निंबाळकर आदी उपस्थित होते.

मंत्री खोत म्हणाले, शिरोळ तालुक्यात 25 हजार एकर शेती क्षारपड होऊन नापिक झाली आहे. अशी शेती क्षारपडमुक्‍त करून शेतकर्‍यांचा उत्कर्ष करण्यासाठी गुरुदत्त शुगर्सने पुढाकार घेतला. शासनाकडे पाठपुरावा करून 25 टक्के अनुदानासह शेतकर्‍यांना भरावी लागणारी 10 टक्के रक्कम स्वत: भरणा करून निघणार्‍या उत्पादनातून परत घेणार आहेत.माधवराव घाटगे म्हणाले, क्षारपडमुक्‍तीसाठी 1 लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. शासन 25 हजार तर उर्वरित रक्‍कम बँका कर्ज रूपाने देणार आहेत. शेतकर्‍यांना 10 हजार रुपये भरावे लागणार आहेत. ज्या शेतकर्‍यांची परिस्थिती नाही त्या शेतकर्‍यांची रक्‍कम गुरुदत्त शुगर्स भरणार आहे. शिरोळ तालुका क्षारपडमुक्‍त करण्यासाठी गुरुदत्त शुगर्स शेतकर्‍यांच्या पाठीशी सदैव असेल.स्वागत उपसरपंच वृषभ कोळी, प्रास्ताविक जि.प.सदस्य विजय भोजे यांनी केले. आभार संजय कोळी यांनी मानले. 

Tags : Kolhapur, protect, MP seat,  he, always, stays, congress, ncp, leaders