Fri, Apr 26, 2019 19:42होमपेज › Kolhapur ›  धडपड फुटबॉलची परंपरा अखंड राखण्यासाठीची!

 धडपड फुटबॉलची परंपरा अखंड राखण्यासाठीची!

Published On: Apr 11 2018 1:33AM | Last Updated: Apr 10 2018 10:37PMकोल्हापूर : सागर यादव 

राजर्षी शाहू, छत्रपती राजाराम, प्रिन्स शिवाजी आणि छत्रपती शहाजी महाराज यांच्या राजाश्रयासह क्रीडाप्रेमी लोकाश्रयाच्या भक्‍कम पाठबळामुळे कोल्हापूरच्या फुटबॉल परंपरेने शतकोत्तर वाटचाल सुरू ठेवली आहे. या परंपरेचे जतन-संवर्धन-संरक्षण करून ती अखंड राखण्यासाठी शिवाजी पेठेतील श्री नेताजी तरुण मंडळासारख्या संस्था-संघटनांनी केले आहे. 1994 पासून फुटबॉल स्पर्धेचे यशस्वी आयोजन करून नवोदित फुटबॉलपटूंना प्रोत्साहन देण्याचे कार्य ही संस्था करत असून यंदा या स्पर्धेचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. 

कोल्हापुरात प्रतिवर्षी रंगणार्‍या फुटबॉल हंगामात अनेक संयोजक विविध बक्षिसांच्या स्पर्धा प्रतिवर्षी आयोजित करतात. मात्र, यात सातत्य नसते. मात्र, शिवाजी पेठेतील श्री नेताजी तरुण मंडळाने 1994 पासून आजतागायत 
स्पर्धेचे अखंड आयोजन केले आहे. इतर संयोजकांच्या तुलनेत कमी रकमेच्या बक्षिसांची स्पर्धा का असेना स्पर्धा त्यांनी घेतली आहे. यामुळे मैदानात दिवस-रात्र एक करून सराव करणार्‍या खेळाडूंना प्रत्यक्ष स्पर्धेत आपला खेळ दाखविण्याची संधी प्राप्त झाली आहे, आजही होत आहे. 

मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजू साळोखे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदीप साळोखे, राजेंद्र राऊत, अमित शिंत्रे, विजयसिंह, पिंटू, शिवराज व रवींद्र राऊत, शिरीष व विनायक पाटील, बॉबी राऊत, रितेश पाटील, रणजित, विनायक, नंदकुमार, यश, अजिंक्य, संकेत, पप्पू, कुमार, विवेक व उमेश साळोखे, योगेश, विशाल, दिगंबर, वैभव व अनुप सुतार, सर्वेश राऊत, आनंदा मेहेकर, दीपक बेडगे, उदय साळोखे, केतन चांदुगडे, सार्थक व नीलेश मगदूम, शहाजी शिंदे, शरद मेढे, सुमित कारेकर, नीलेश, रोहित व आशिष मगदूम, इंद्रजित व गौरव जाधव, स्वप्निल पोवार, अमित व सुमित कारेकर, शैलेश सूर्यवंशी, अभिजित गायकवाड अशी टीम स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी प्रतिवर्षी कार्यतत्पर असते.   

वैशिष्ट्यांनी परिपूर्ण रौप्य महोत्सवी ‘अटल चषक’ स्पर्धा

रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त स्पर्धा अविस्मरणीय व्हावी, या उद्देशाने कोल्हापूर स्पोर्टस् डेव्हलपमेंट इनिशिएटिव्ह (केएसडीआय) यांच्या सहकार्याने आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे कोल्हापूरच्या फुटबॉल इतिहासात आतापर्यंतचे सर्वाधिक बक्षिसांची ही स्पर्धा आहे. विजेत्या संघास 5 लाख, उपविजेत्या संघास 3 लाख, तिसरा व चौथा क्रमांक पटकाविणार्‍या संघांना प्रत्येकी 50 हजार, दुसर्‍या फेरीतून बाद होणार्‍या संघांना प्रत्येकी 20 तर पहिल्या फेरीतून बाहेर पडणार्‍या प्रत्येक संघास 10 हजार रुपयांचे रोख बक्षीस आहे. याशिवाय सामनावीर, मालिकावीर, लढवय्या अशा अनेक बक्षिसांनी परिपूर्ण अशी ही स्पर्धा आहे.

याशिवाय स्पर्धेतील सामन्यांच्या तिकिट विक्रीतून मिळणार्‍या उत्पन्‍नातून ‘कोल्हापूर फुटबॉल वेलफेअर’ फंड उभारण्यात येणार आहे. या फंडातून होतकरू-गरीब फुटबॉलपटूंना आवश्यक मदत पुरविली जाणार आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील, पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई व सर्व नगरसेवक, केएसडीआयचे अध्यक्ष सुजय पित्रे, सचिव दिग्विजय मळगे यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक देसाई, तुषार देसाई, सचिव दिग्विजय मळगे, आर्टिस्ट राजू साठे, हेमंत अराध्ये, अमोल पालोजी, हेमंत कांदेकर व त्यांचे सहकारी ‘अटल चषक’स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सक्रिय आहेत.

Tags : Kolhapur, maintain,  tradition,  playing, football, continuously