Fri, Jul 19, 2019 22:30होमपेज › Kolhapur › कोल्हापूर पोलिस आयुक्‍तालयाला मिळणार चालना

कोल्हापूर पोलिस आयुक्‍तालयाला मिळणार चालना

Published On: Mar 23 2018 1:57AM | Last Updated: Mar 23 2018 1:09AMकोल्हापूर : दिलीप भिसे 

कोल्हापूर पोलिस आयुक्‍तालयाच्या दीर्घकालीन प्रलंबित प्रश्‍नावर विधिमंडळात तोंड फुटल्याने पोलिस आयुक्‍तालयाचा विषय लवकरच निकालात निघण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: सुतोवाच केल्याने कोल्हापूर पोलिस दलाला मोठे बळ मिळणार हे निश्‍चित.जिल्ह्यातील लोकसंख्येच्या तुलनेत पोलिस मनुष्यबळ अपुरे आहे. दिवसागणिक गुन्ह्यांत वाढ होत राहिल्याने शहरासह ग्रामीण भागात असुरक्षिततेची भावना आहे. पोलिस आयुक्‍तालयामुळे शहरासह ग्रामीण भागात सुरक्षितता अबाधित राहण्यास मदत होणार आहे.

आयुक्‍तासह मोठा फौजफाटा!

कोल्हापूर पोलिस आयुक्‍तालयासाठी प्रस्तावित वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांची पदे व  आवश्यक मनुष्यबळाची गरज पुढीलप्रमाणे : पोलिस आयुक्‍त 1, पोलिस उपायुक्‍त 2, सहायक पोलिस आयुक्‍त 10, पोलिस निरीक्षक 48, सहायक पोलिस निरीक्षक, उपनिरीक्षक 145, पोलिस कर्मचारी 3 हजार, सद्यस्थितीत 1 हजार 200 कर्मचार्‍यांची गरज.

13 पोलिस ठाणी प्रस्तावित

पोलिस आयुक्‍तालय प्रस्तावांतर्गत शहरातील प्रमुख चार पोलिस ठाण्यासह इचलकरंजी परिसरातील एकूण 13 पोलिस ठाण्यांचा अंतर्भाव राहणार आहे. लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा, राजारामपुरी, शाहूपुरी, करवीर, गांधीनगर, गोकुळ शिरगाव, शिरोली एमआयडीसी, शिवाजीनगर, गावभाग, शहापूर, हुपरी पोलिस ठाण्यांचा समावेश असेल.

पोलिस मनुष्यबळ वाढणार दुप्पटीने 

पोलिस आयुक्‍तालय व  जिल्हा ग्रामीण अशा दोन स्वतंत्र पोलिस यंत्रणा जिल्ह्यात कार्यरत राहणार आहेत. उपलब्ध पोलिस फौजफाट्याशिवाय किमान दुप्पट संख्येने मनुष्यबळ वाढणार आहे. पोलिस आयुक्‍तालयांतर्गत कायदा सुव्यवस्थेसह प्रतिबंधात्मक कारवाईचे सर्वाधिकार पोलिस आयुक्‍तांना आहेत. पोलिस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारी टोळ्यासह काळेधंदेवाल्यांविरुद्ध तडीपारीसह अन्य कारवाईबाबतही झटपट निर्णय होणे सुलभ होऊ शकते.

Tags : Kolhapur, Kolhapur News, Kolhapur Police commissioner office, started soon