होमपेज › Kolhapur › यादवनगरात घरावर तुफान दगडफेक

यादवनगरात घरावर तुफान दगडफेक

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

पोलिसांत तक्रार दिल्याच्या रागातून यादवनगरातील अश्‍विन शेळके यांच्या घरावर तुफान दगडफेक करण्यात आली. बुधवारी रात्री नऊच्या सुमारास हा प्रकार घडला. व्हॅन, रिक्षासह चार दुचााकींचीही तोडफोड करण्यात आली आहे. हल्‍लेखोरांनी येथील न्यू क्रांती तरुण मंडळाच्या व्यायामशाळेच्या काचाही फोडल्या. रात्री उशिरापर्यंत परिसरात तणावाचे वातावरण होते.

यादवनगरातील कोटीतीर्थ विद्यामंदिरनजीक अश्‍विन शेळके राहण्यास आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी परिसरातील गुंडगिरीविरोधात पोलिसांत तक्रार केली होती. याचा राग मनात धरून गेले काही दिवस त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू होता. बुधवारी रात्री परिसरात राहणार्‍या राजकीय पुढार्‍याने साथीदारांच्या मदतीने त्यांच्या घरावर हल्‍ला केला.पन्‍नासहून अधिक हल्‍लेखोरांनी शेळकेंच्या घरावर तुफान दगडफेक केली.

दगडफेकीत शेळके यांच्या घरातील प्रापंचिक साहित्याचे नुकसान झाले आहे. त्यांचे कुटुंबीयही यामध्ये किरकोळ जखमी झाले.यानंतर हल्‍लेखोरांनी घरासमोरील वाहने लक्ष्य केली. व्हॅन, रिक्षाच्या काचा फोडण्यात आल्या. तसेच दोन मोटारसायकली व दोन मोपेडवर मोठ-मोठे दगड टाकून तोडफोड करण्यात आली. शेजारी असणार्‍या न्यू क्रांती तरुण मंडळाच्या सभागृहाच्या काचाही फोडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. यानंतर हल्‍लेखोर पसार झाले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. 

Tags : Kolhapur, Kolhapur News, night, tense, atmosphere, area.


  •