Wed, Feb 20, 2019 13:37होमपेज › Kolhapur › गणेशोत्सव वर्गणीसाठी धमकाविले; चौघांना नोटिसा

गणेशोत्सव वर्गणीसाठी धमकाविले; चौघांना नोटिसा

Published On: Sep 11 2018 1:36AM | Last Updated: Sep 10 2018 11:51PMकोल्हापूर : प्रतिनिधी

वर्गणीसाठी धमकाविल्याप्रकरणी राजारामपुरी परिसरातील एका गणेशोत्सव मंडळाच्या चार कार्यकर्त्यांना राजारामपुरी पोलिसांनी सोमवारी नोटीस बजावली आहे. जबरदस्तीने वर्गणी वसूल करीत असल्याप्रकरणी खंडणीचा गुन्हा का दाखल करू नये, याबाबत खुलासा करा, असे नोटिशीत म्हटले आहे. चारही तरुण कॉलेजकुमार आहेत.

राजारामपुरी येथील खाऊ गल्लीतील फेरीवाल्यांकडून जबरदस्तीने मंडळासाठी पाच हजार रुपयांची वर्गणी वसूल करण्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याकडे थेट तक्रार करण्यात आली.  पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार राजारामपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक औदुंबर पाटील यांनी चारही तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशी करून त्यांची सुटका करण्यात आली. मात्र, चौघांना नोटीस बजाविण्यात आली आहे. दरम्यान, हा प्रकार घडलाच नाही, असा कार्यकर्त्यांनी दावा केला आहे. खोडसाळपणातून नोटीस बजावण्यात आल्याची त्यांनी तक्रार केली आहे.