Mon, Aug 19, 2019 14:12होमपेज › Kolhapur › आम्ही धमक्यांना घाबरत नाही!

आम्ही धमक्यांना घाबरत नाही!

Published On: Aug 01 2018 1:24AM | Last Updated: Aug 01 2018 12:38AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

ऐतिहासिक दसरा चौकात मराठा आरक्षणासाठी ‘सकल मराठा ठोक मोर्चा’ ठिय्या आंदोलन गेल्या सात दिवसांपासून शांततेत सुरू आहे.जिल्ह्यातील ग्रामीण भागात देखील आरक्षणासाठी गाव बंद करून निषेध नोंदवला जात आहे. असे असताना सकल मराठा ठोक मोर्चातील प्रमुख दोन संयोजकांना धमकी देण्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी घडला. 

या घटनेचा आंदोलकांनी दसरा चौकात निषेध नोंदवून ‘आम्ही धमक्यांना घाबरत नाही... घुसून ठोकू,’ असा इशारा दिला. मंगळवारी शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सकल मराठा बांधवांनी दसरा चौकात येऊन मराठा आरक्षणास जाहीर पाठिंबा  देऊन ठिय्या मांडला. 

मंडलिक युवा प्रतिष्ठानने मराठा आरक्षणासाठी पाठिंबा दिला. यावेळी वीरेंद्र मंडलिक, बंडोपंत चौगले, नामदेव मेडके, विजय भोसले, विश्‍वास कराडे, एम. आर. पाटील, शहाजी पाटील, शहाजी यादव, दिनकर पाटील, निवास पाटील, कैलास पाटील, सुधीर पाटोळे, दत्ता चौगले, राजू पाटील, एम. एस. पाटील, शंकर पाटील उपस्थित होते.

आंबेवाडी येथील युवकांचा आंदोलनात सहभाग 
आंबेवाडी (ता. करवीर) येथील युवकांनी दुचाकी रॅली काढून गाव बंद पाळून ग्रामस्थांनी दसरा चौकातील ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला. यावेळी सरपंच सिकंदर मुजावर, उपसरपंच छाया जाधव, विक्रम अतितकर, तेजस सुतार, किरण आंबे, सुजय काटकर, नंदा शिपेकर, लता तांबवेकर, नेहा अतितकर, सागर काकडे, भरत गायकवाड, नीलेश पाटील, कीर्ती शिंदे, इंद्रजित पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

शाहू वैधिक स्कूलतर्फे आंदोलनस्थळी ठिय्या 
शाहू वैधिक स्कूलने पाठिंबा जाहीर करून आंदोलनस्थळी ठिय्या मांडला. यावेळी राजेंद्र वेदांते, संजय वेदांते, संग्राम ढोले, कृष्णात गुरव, सचिन भाट, रामदास पाटील आदी उपस्थित होते. संयुक्त शुक्रवार पेठेने गंगावेश येथे मानवी साखळी करून शांततेत मोर्चाने दसरा चौकातील ठिय्या आंदोलनास पाठिंबा देत ठिय्या मांडला. यामध्ये सतीश पाटील, संजय माळवी, किशोर घाटगे, प्रकाश गवंडी, राकेश पोवार, जहाँगीर अत्तार, सन्मुख डोमने, श्रीधर गाडगीळ, निवास काटकर, रियाज बागवान यांच्यासह महिला, आजी-माजी नगरसेवक, महिला बचत गटांसह तरुण मंडळे, तालीम संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

यवलूज ग्रामस्थांनी मोर्चाने येऊन ठिय्या आंदोलनास पाठिंबा दिला.सरपंच पांडुरंग काशीद, कृष्णात आडनाईक, अभिजित आडनाईक, विक्रम व्हरांबळे, दत्तात्रय कोळी, प्रवीण पाटील, सखाराम माने आदी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. सकल मराठा क्रांती संघटना पट्टण कोडोलीच्या ग्रामस्थांनी दुचाकी रॅली काढून गाव बंद पाळून कोल्हापुरातील ठिय्या आंदोलनास पाठिंबा दिला.
यावेळी मच्छिंद्र जाधव, विजय डुबले, आप्पासाो जाधव, राजू पोवार, पिंटू दुर्गे, अनिल सावंत, अभी भालकर, अभी म्हाकवे, विनायक जाधव, संदीप फगरे, महेंद्र कुडाळे यांच्यासह युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

किणी (ता. हातकणंगले) ग्रामस्थांनी गावातील व्यवहार बंद ठेवून ठिय्या आंदोलनास पाठिंबा देत दसरा चौकात ठिय्या मांडला. यावेळी दीपक घाटगे, संताजी माने, अमित खांडेकर, अभिजित हवलदार, अभिजित शेळके, अरुण शेळके, प्रवीण खोपकर, अमोल शेळके, प्रवीण भोसले, नंदकुमार माने, संदीप चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. 

कुंभी-कासारी कारखाना, भोगावती सहकारी कारखाना, छत्रपती राजाराम कारखाना कर्मचारी संघटनांच्या पदाधिकारी व कर्मचार्‍यांनी मराठा आरक्षणास पाठिंबा देऊन ठिय्या आंदोलनात सहभागी झाले. यावेळी राऊसाो पाटील, संदीप भोसले, अविनाश पाटील, शिवाजी डोंगळे, एम. एस. पाटील, शंकर कदम, उदय यादव, सुभाष गुरव यांच्यासह पदाधिकारी, कर्मचारी, प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

आंबेडकर समाज संघटनांनी मोर्चाने मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला. यामध्ये उत्तम कांबळे, प्रा. शहाजी कांबळे, प्रा विश्‍वासराव देशमुख, दगडू भास्कर, सुभाष देसाई, बाबासाहेब भोसले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित हेाते. शिवसेना अपंग सहाय्य सेनाचे अमित मिरजे, दीपक बिडकर, लक्ष्मण घुगरे, दीपक काळे, अशोक सोनवणे, भारत पाटील, संदीप राऊत, सदाशिव निगवेकर यांनी आरक्षणाला पाठिंबा दिला. 

मराठा पोलिस बॉईज संघटना, प्रांत ग्राहक संरक्षण परिषद समिती, श्री जोतिर्लिंग नागरी पतसंस्था मर्यादित वाकरे, सीपीआर महाविद्यालय व कर्मचारी संघटनेने मोर्चाने येऊन ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला. डॉ.वसंतराव देशमुख, बंटी सावंत, डॉ. सुभाष नांगरे, कैलास पाटील, डॉ.सागर पाटील, महादेव पाटील, किरण सूर्यवंशी, बाळासाहेब कवाळे, डॉ. उदय पाटील, शामराव पोवार, डॉ. गिरीश पाटील, बळवंत पाटील, शशिकांत भोरे, राहुलकुमार ऐटाळे, एम. व्ही. बनसोडे, अतुल पाटील, प्रकाश शिंदे, रमेश देसाई, तेजस बागडी, संदीप दळवी, सागर ढेरे, राणी घावरी, गीता पडवळे, सौरभ पाटील, एम. एस. पाटील, गौरी पाटील, ज्योती भोसले, मेघना चौगुले, अनिता जाधव, धनाजी जाधव, सुरेश सरनोबत, दिलीप जाधव, सतीश शिंदे, विलास तोडकर, सतीश पाटील, केतन माळी, संग्राम घोरपडे, अस्लम म्हलदार, राहुल पोवार, संदीप नलवडे, विनायक निकम, नितीन धामणे, बी. नागरगोजे, राजू शेखर, हंबीरराव कांबळे, इम्रान जमादार, कमलाकर सुतार, एम. एस. पाटील, विवेक पोवार आदी उपस्थित होते. वंदूरचे सरपंच बाळासाहेब पाटील, एकोंडीचे सरपंच सुधीर पाटोळे, बाचणीचे सरपंच निवास पाटील उपस्थित होते.

जाळपोळ, दगडफेक करू नका...
आंदोलनाची धग सर्वदूर पोहोचली असून मराठा आरक्षणासाठी आंदोलक आक्रमक झाला आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत तोडफोड आणि जाळपोळ सुरू आहे. पण, कोल्हापूर जिल्ह्यात सकल मराठा क्रांती ठोक मोर्चा आंदोलन सनदशीर मार्गाने सुरू आहे. यापुढे देखील शांतता आणि संयम सर्वांनी राखावा, असे आवाहन सकल मराठा क्रांती ठोक मोर्चाचे संयोजक पाठिंबा देण्यासाठी येणार्‍या समाजबांधवांना सांगत आहेत. 

आंदोलनाची माहिती येथेही द्या...
जिल्ह्यात सकल मराठा क्रांती ठोक मोर्चा आंदोलन गेली सहा दिवस शांततेत सुरू आहे. ऐतिहासिक दसरा चौकात गेली सात दिवस सकल मराठा क्रांती ठोक मोर्चा समन्वय समितीच्या वतीने ठोक नव्हे, तर ठिय्या आंदोलन सुरू आहे.जिल्ह्यातील सकल मराठा  बांधवांनी आंदोलनची पूर्व कल्पना 9923580909 किंवा 9096807888 या दूरध्वनी क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.