कोल्हापूर : प्रतिनिधी
क्रेडिट कार्डवरील खर्च करण्यात आलेली रक्कम भरण्यासाठी आई आणि बायकोला विकण्याचा सल्ला देऊन खळबळ उडवून देणार्या रत्नाकर बँकेच्या दोन महिला अधिकार्यांवर मंगळवारी रात्री निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. सुप्रिया पाठक आणि शीतल (रा. मुंबई) अशी त्यांची नावे आहेत. बँकेने केलेल्या चौकशीत दोन्ही महिला अधिकारी आढळून आल्याचे रत्नाकर बँकेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. बँकेच्या राजारामपुरी शाखेतील खातेदार श्रेयस पोतदार यांना क्रेडिट कार्ड दिले होते.
1 लाख 22 हजार रुपयांच्या व्यवहाराची क्षमता असलेल्या कार्डवर पोतदार यांच्याकडून 1 लाख 89 हजार रुपयांच्या व्यवहाराची क्षमता असलेल्या कार्डवर पोतदार यांच्याकडून 1 लाख 22 हजार रुपयाची रक्कम थकीत होती. थकीत रक्कम त्वरित भरावी यासाठी बँकेच्या वसुली विभागामार्फत तगादा सुरू होता. मुंबई शाखेतील वसुली विभागातील सुप्रिया पाठक, शीतल या दोन महिला अधिकार्यांनी दि.24 ते 27 एप्रिल या काळात पोतदार यांच्या मोबाईलवरून संपर्क साधून अश्लील भाषेत धमकावले होते. या घटनेवर राज्यभरातून संतापाच्या प्रतिक्रिया उमटल्या होत्या.