Wed, Feb 20, 2019 23:55होमपेज › Kolhapur › सोनसाखळी चोरट्यास अटक

सोनसाखळी चोरट्यास अटक

Published On: Dec 10 2017 1:19AM | Last Updated: Dec 09 2017 11:31PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी 

महिलांचा पाठलाग करून दागिने हिसकावणार्‍या सज्जनसिंग धम्मनसिंग बावरी (वय 25, रा. मणेरमळा, उचगाव) याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली. महावीर गार्डन व मुक्‍त सैनिक वसाहत परिसरात झालेल्या सोनसाखळी चोर्‍यांची त्याने कबुली दिली. 

लिशा हॉटेल चौकात गस्तीदरम्यान पोलिसांना सज्जनसिंग संशयितरीत्या फिरताना मिळून आला होता. त्याला अटक करून चौकशी केली असता त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. 
24 ऑक्टोबर रोजी महावीर गार्डनमध्ये फिरायला आलेल्या महिलेच्या गळ्यातील गंठण त्याने हिसकावले होते.

तसेच 1 नोव्हेंबर 2017 रोजी मुक्‍त सैनिक वसाहत येथे पायी निघालेल्या महिलेचा पाठलाग करून गळ्यातील गंठण हिसडा मारून पळवले होते. दोन्ही गुन्ह्यांमध्ये तो पायी चालत फिरत होता.