Wed, Jul 17, 2019 08:32होमपेज › Kolhapur › आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही!

आता आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही!

Published On: Jul 29 2018 1:22AM | Last Updated: Jul 28 2018 11:47PMकोल्हापूर : प्रतिनिधी

मराठा आरक्षणासाठी दसरा चौक येथे सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला विविध संस्था, संघटना, तरुण मंडळे, ग्रामपंचायतींकडून पाठिंबा मिळत आहे. शनिवारी विविध संघटनांनी आंदोलनाला जाहीर पाठिंबा देऊन लढा यशस्वी होईपर्यंत पाठीशी राहण्याची ग्वाही दिली.

गोकुळ दूध संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील आणि संचालकांनी आंदोलनस्थळी भेट देऊन पाठिंबा जाहीर केला. यावेळी संचालक अरुण डोंगळे, धैर्यशील देसाई, विश्‍वास जाधव, बाळासाहेब खाडे, दीपक पाटील, रामराजे कुपेकर आदी उपस्थित होते. 

कोल्हापूर जिल्हा व्यापारी व उद्योजक महासंघाच्या वतीने अध्यक्ष सदानंद कोरगावकर यांनी पाठिंब्याचे पत्र दिले. यावेळी अमर क्षीरसागर, सचिन शहा, अमोल नष्टे, विनोद पटेल, प्रवीण शहा आदी उपस्थित होते. पांजरपोळ उद्योगिक वसाहतीतील राजर्षी शाहू लघु उद्योजक असोसिएशनच्या वतीने अध्यक्ष चंद्रकांत सूर्यवंशी यांनी पाठिंब्याचे पत्र दिले. कोल्हापूर जिल्हा मोटार ड्रायव्हिंग स्कूल असोसिएशनच्या वतीने पाठिंब्याचे पत्र देण्यात आले. 

कोल्हापूर मंडप लाईटिंग डेकोरेशन असोसिएशनने आंदोलनाला पाठिंबा दिला. यावेळी सागर चव्हाण, तुकाराम पाटील, किरण गवळी, मुसा शिकलगार, विजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते. कोल्हापूर जिल्हा सामाजिक सेवा व सांस्कृतिक मंगल कार्यालय संस्थेच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. समस्त राजस्थानी जैन श्‍वेतांबर मारवाडी समाजाच्या वतीने पाठिंब्याचे पत्र देण्यात आले. यावेळी नगरसेवक ईश्‍वर परमार, अध्यक्ष नरेंद्र ओसवाल, उपाध्यक्ष राजेश ओसवाल, गुलाबचंद राठोड, कांतिलाल ओसवाल आदी उपस्थित होते.

मौजे मादळे (ता. करवीर) येथील आश्रय अपंग व सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या दिव्यांग बांधवांनी जाहीर पाठिंबा दिला. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कोल्हापूर जिल्हा व शहर, खाटिक समाज कोल्हापूर यांच्या वतीने पाठिंबाचे पत्र दिले. कोल्हापूर जिल्हा स्वातंत्र्यसैनिक संघटनेच्या वतीने पाठिंब्याचे पत्र दिले. यावेळी अध्यक्ष प्राचार्य व्ही. डी. माने, सचिव सुंदर देसाई, गणपती पाटील, प्रा. डी. डी. चौगले उपस्थित होते. दैवज्ञ शिक्षण समाज बोर्डिंगच्या पाठिंब्याचे पत्र देण्यात आले. यावेळी अध्यक्ष सुधाकर पेडणेकर, उपाध्यक्ष दिलीप भुर्केे, सचिव विजय घारे, उपसचिव चंद्रकांत नार्वेकर, पद्माकर नार्वेकर आदी उपस्थित होते. संभाजी ब्रिगेडतर्फे पाठिंब्याचे पत्र देण्यात आले. यावेळी प्रदेश कार्याध्यक्ष हिंदुराव हुजरे-पाटील, जिल्हाध्यक्ष प्रवीण पाटील, शिवाजी खोत, संदीप भोसले, सुधाकर पाटील उपस्थित होते.

प्रयाग चिखली (ता. करवीर) येथील ग्रामस्थांनी आज रॅलीने आंदोलनस्थळी भेट दिली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य एस. आर. पाटील, रघुनाथ पाटील, केवलसिंग रजपूत, बळवंत कळके, शहाजी पाटील आदी ग्रामस्थ होते. सोनतळी, व रजपूतवाडीच्या सर्व ग्रामस्थांनी पाठिंब्याचे पत्र दिले. 

निपाणीच्या सकल मराठा समाज कल्याण संस्थेचा पाठिंबा निपाणीतील सकल मराठा समाज कल्याण संस्थेच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन निपाणी बंद पाळला. निपाणीवासीय कोल्हापुरात येऊन दसरा चौकातील ठिय्या आंदोलनात सहभागी झाले.