Wed, Aug 21, 2019 01:56होमपेज › Kolhapur › पक्षांतर्गत गटबाजीला थारा नको

पक्षांतर्गत गटबाजीला थारा नको

Published On: Mar 13 2018 1:41AM | Last Updated: Mar 13 2018 12:56AMपेठवडगाव : वार्ताहर

आगामी विधानसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आमदार शिवसेनेचे निवडून आणण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे, असे प्रतिपादन शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी केले. शिवसेना पक्षात मतभेद व अंतर्गत गटबाजीला थारा देऊ नका, असे आवाहनही त्यांनी केले.

वडगाव शहर शिवसेनाप्रमुख संदीप पाटील यांनी आयोजित केलेल्या हातकणंगले तालुका शिवसेना मेळावा व वडगावमध्ये उभारण्यात आलेल्या स्व. बाळासाहेब ठाकरे बसस्थानकाचा उद्घाटन समारंभ अशा संयुक्‍त कार्यक्रमात ते बोलत होते. शिरोळचे आमदार उल्हास पाटील व युवक क्रांती महाआघाडीच्या नेत्या श्रीमती प्रविता सालपे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.  नगरसेवक व शहरप्रमुख संदीप पाटील यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर आ. उल्हास पाटील, नगराध्यक्ष मोहनलाल माळी, जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव, बंडखोर सेनेचे अध्यक्ष शिवाजीराव आवळे, शिवसेना तालुकाप्रमुख बाजीराव पाटील यांनी मनोगत व्यक्‍त केले. अकबर पन्हाळकर व भैया खटावकर यांनी सूत्रसंचालन केले.