Wed, May 22, 2019 22:19होमपेज › Kolhapur › उजवा कालवा बंद पाडणार्‍यांना पाणी नाही

उजवा कालवा बंद पाडणार्‍यांना पाणी नाही

Published On: May 29 2018 1:39AM | Last Updated: May 29 2018 12:09AMदानोळी/अर्जुनवाड : वार्ताहर

इचलकरंजीचे आमदार पाण्याचे राजकारण करीत आहेत. उजवा कालवा बंद पाडणार्‍यांना आताच का वारणेच्या पाण्याची गरज वाटत आहे. ते खोटे बोलत आहेत. जनतेच्या नावाखाली उद्योगाला पाणी नेण्याचा त्यांचा घाट आहे. मात्र, नदीच्या उगमापासून संगमापर्यंत एक थेंबही पाणी मिळणार नाही, असा इशारा आ. उल्हास पाटील यांनी दिला.तमदलगे व अर्जुनवाड येथे पंचगंगा-कृष्णा शुद्धीकरण व साखळी उपोषणप्रसंगी ते बोलत होते. वारणा विरोधी कृती समितीचे अध्यक्ष महादेव धनवडे, सरपंच सुनील चौगुले उपस्थित होते. 

महादेव धनवडे यांनी वारणा बचावसाठी अर्जुनवाड ग्रामस्थांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहन केले. यावेळी कनवाडचे सरपंच बाबासाहेब आरसगोंडा, नंदू पाटील, प्रदीप चौगुले, प्रमोद पाटील, विजय सूर्यवंशी, पराग पाटील, बंटी देसाई, बाळ पाटील, सुरेश कांबळे, विलास पाटील यांच्यासह अर्जुनवाड परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित हेते. 

तमदलगे : येथे योजनेविरुद्ध साखळी उपोषण झाले. आ. पाटील, राजेंद्र पाटील-यड्रावकर व बचाव समितीचे प्रतिनिधी, ग्रामस्थ सहभागी होते. यड्रावकर म्हणाले, इचलकरंजीच्या लोकप्रतिनिधींनी मजरेवाडी किंवा राजापूर बंधार्‍यातून पाणी न्यावे. पंचगंगा शुद्ध करावी. वेळ न दवडता हा निर्णय घ्यावा, असा इशारा दिला.

केशव राऊत, सर्जेराव शिंदे, मानाजीराव भोसले, सतीश मलमे, सरपंच सपना कांबळे, बापू दळवी, शंकर शिरसट, पीरगोंड पाटील यांची भाषणे झाली. यावेळी बालकल्याण समिती सभापती शुभांगी शिंदे, उपसरंपच सुनीता पुजारी, चंद्रकांत रुग्गे, दीपक खाडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.