Sat, Apr 20, 2019 10:02होमपेज › Kolhapur › 10 लाखांच्या सळी चोरीचा छडा

10 लाखांच्या सळी चोरीचा छडा

Published On: Feb 06 2018 1:46AM | Last Updated: Feb 06 2018 12:36AMकोल्हापूर/हुपरी : प्रतिनिधी

चालकाचे अपहरण करून दहा लाख रुपये किमतीच्या स्टिल सळीने भरलेला ट्रक पळवून नेणार्‍या सराईत टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषणने सोमवारी गजाआड केले. रेंदाळ-बोरगाव मार्गावर ही घटना घडली होती. टोळीकडून चोरीच्या गुन्ह्यातील ट्रकसह 18 लाख 15 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. 17 जानेवारी 2017  रोजी ही घटना घडली होती.

 टोळीचा सूत्रधार संतोष ऊर्फ सनी अनंता बगाडे (वय 27, रा. जयभीमनगर, नवीन नगरपालिका इमारतशेजारी, इचलकरंजी), रियाज आयुब हैदर (21, इनाम मशिदीजवळ, आझादनगर, कबनूर), दीपक अनिल सावंत (23, महात्मा गांधीनगर, जे. के. नगर, तारदाळ, ता. हातकणंगले), किरण ऊर्फ अमर अनंता बगाडे (24, इचलकरंजी), अभिजित निवास संकपाळ (32, हॉटेल विजयराज), साजिद ऊर्फ टिपू दस्तगीर नाईक (26, बेघर वसाहत, शाहूनगर, कागल) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

फरारी संशयित सनी मोहिते (रा. रामनगर, उचगाव), अक्षय अर्जुन भोसले, मनीष भरत सागावकर, सुखदेव ढावारे (रा. इचलकरंजी) यांचा शोध सुरू असल्याचे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते यांनी सांगितले.संशयिताविरुद्ध हुपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे.

फिर्यादी प्रवीण भीमराव जाधव (रा. कागवाड, ता. अथणी) हे त्याच्याकडील ट्रकमधून कागल पंचतारांकित एमआयडीसी येथून लोखंडी सळी भरून रेंदाळ-बोरगाव मार्गे जात असताना संशयितांनी दि. 17 जानेवारीला ट्रक अडविला.फिर्यादीसह चालकाचे अपहरण करून त्यांना अन्यत्र मोटारीत बसवून त्यांचे अपहरण केले.

या घटनेनंतर जिल्ह्यात नाकेबंदीही करण्यात आली होती.पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी एलसीबीचे पोलिस निरीक्षक दिनकर मोहिते व टीमला संशयिताचा शोध घेण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार पथकाने वरिष्ठस्तरावर शोधमोहीम राबवून टोळीतील सहा जणांना अटक केली आहे. टोळीतील बहुतांश संशयिताविरुद्ध गंभीर गुन्ह्यांचे रेकॉर्ड असल्याचेही मोहिते यांनी सांगितले.