Wed, Jan 23, 2019 04:28होमपेज › Kolhapur › पर्यायी शिवाजी पुलाचे काम गतीने

पर्यायी शिवाजी पुलाचे काम गतीने

Published On: May 24 2018 1:22AM | Last Updated: May 24 2018 12:24AMकोल्हापूर : प्रतिनिधी

पंचगंगेवरील शिवाजी पुलाच्या पर्यायी पुलाचे काम सोमवारी सुरू करण्यात आले असून, तीन दिवस सपाटीकरणाचे काम युद्धपातळीवर सरू आहे. प्राथमिक टप्प्यातील काम सुरू झाल्यामुळे या पुलाच्या कामास गती आली आहे. पंचगंगेवरील पर्यायी पुलाचे काम पुरातत्त्व कायद्यामुळे रखडले आहे. पुलाचे सुमारे 20 टक्के बांधकाम शिल्लक राहिले आहे. मात्र, जिल्हा पोलीस प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्या पुढाकाराने या पर्यायी पुलासाठी प्राथमिक टप्प्यातील कामांना सुरुवात झाली आहे. प्राथमिक टप्प्यात जमीन सपाटीकरण, झुडपे तेथील किरकोळ माती डबर हलविणे आदी कामे युद्धपातळीवर सुरू आहेत.  जेसीबीच्या साह्याने  हौदाचे बांधकाम पाडले असून, या हौदाचे दगड, माती तेथून हलविण्यात आली आहे.

जमीन सपाटीकरणास जेसीबी आणि मनुष्यबळाचा वापर करण्यात येत आहे. यासंदर्भात झालेल्या आंदोलनामुळे पुन्हा काही प्रकार घडू नये म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  कृती समितीचे  कार्यकर्तेही पर्यायी पुलाच्या कामाच्या ठिकाणी भेट देऊन कामाबाबत माहिती घेत आहेत. दरम्यान, पुरातत्त्व खात्याच्या परवानगीसाठी जिल्हा पोलीस प्रशासन आणि सार्वजनिक बांधकाम राष्ट्रीय महामार्ग विभाग यांच्या पुढाकाराने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. येत्या आठ दिवसांत यास यश मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.