Sat, Nov 17, 2018 12:08होमपेज › Kolhapur › भररस्त्यात महिलेची छेड काढणार्‍या दोघांना अटक

भररस्त्यात महिलेची छेड काढणार्‍या दोघांना अटक

Published On: Jul 06 2018 1:32AM | Last Updated: Jul 06 2018 12:05AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

पार्वती टॉकीज परिसरात महिलेला रस्त्यात अडविण्याचा तसेच तिच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करणार्‍या दोघांना राजारामपुरी पोलिसांनी अटक केली. महेश महादेव तेवरे (रा. बागल चौक), सचिन शंकर फाळके (जवाहरनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. 

संबंधित महिला बुधवारी सायंकाळी पार्वती टॉकीजसमोरून घरी जात असताना महेश तेवरे याने चारचाकी तिच्या आडवी मारली. तिला अडवून अश्‍लील हावभाव केले. याला या महिलेने प्रत्युत्तर देत दोघांना निघून जाण्यास सांगितले. मात्र, त्यानंतर दोघांनी तिचा पाठलाग करून घरात घुसण्याचा प्रयत्न केला. तसेेेच तिला शिवीगाळ केली. पीडित महिलेने तत्काळ राजारामपुरी पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिस निरीक्षक औैदुंबर पाटील यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून महिलेनेे दिलेल्या वर्णनावरून चारचाकीचा व संशयितांचा शोध घेत त्यांना अटक केली. दोघांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.