Wed, Oct 16, 2019 18:19होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : 'या' गावात गणराय असतात ३६४ दिवस!

कोल्हापूर : 'या' गावात गणराय असतात ३६४ दिवस!

Published On: Sep 11 2019 7:44PM | Last Updated: Sep 11 2019 7:44PM

संग्रहीत छायाचित्रभडगाव (कोल्हापूर) : एकनाथ पाटील 

गणपती बाप्पा मोरया..पुढच्या वर्षी लवकर या...अशी साद भक्तजन बाप्पाला घालतात.. पण गणेशोत्सवाची आगळीवेगळी परंपरा वर्षानुवर्षे कागल तालुक्यातील कुरणी गावात पहावयास मिळत आहे, या गावात गणेश चतुर्थीला आलेले बाप्पा वर्षातील ३६४ दिवस भक्तांच्या घरी मुक्काम करतात. पन्नासहून अधिक घरांत वार्षिक गणपती ठेवले जातात.  

गणेशोत्सव म्हटले कि गणेश चतूर्थी दिवशी आगमन त्यानंतर गौरीपूजन व घरगुती गणेश व गौरी विसर्जन केले जाते. त्यानंतर अनंत चतुर्थी दिवशी सार्वजनिक गणेश मंडळाची गणेश विसर्जन करून भक्तीमय वातावरणात भाविक गणेशाला निरोप देतो. पुढच्या वर्षी लवकर या अशी परंपरा गणेशोत्सवाच्या काळात सर्वत्र पहावयास मिळते.

साडेतीन हजार लोकसंख्या असलेल्या कुरणी गावात तीनशेहून आधिक घरात गणेशोत्सव काळात गणेश मुर्ती प्रतिष्ठापना होते. त्यापैकी पन्नासहून अधिक घरात प्रत्येक वर्षी गणेश चुतुर्थीला आणलेली मुर्ती गणेश विसर्जनाला न विसर्जन करता ३६४ दिवस आपल्या घरात भक्तीमय वातावरणात पूजा करतात. प्रत्येक वर्षी गणेश चतुर्थीच्या आगोदर एक दिवस या वार्षिक गणेश मुर्तींचे विसर्जन मोठ्या भक्तीमय वातावरणात केले जाते. 

वार्षिक गणेश उत्सवाची कुरणी गावात अनेक घरामध्ये गणेश चतुर्थीला प्रतिष्ठापना केली जाते. ही गणेश मुर्ती पुढच्या वर्षीच्या गणेशउत्सवा पर्यंत असते हि परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. ही परंपरा आजही अनेक परिवाराकडून जपली आहे. भक्तांची श्रध्दा आणि परंपरा आजही कायम राखली आहे. 

- शैलजा मारूती पाटील, कुरणी, ता. कागल