Thu, Jun 20, 2019 14:39होमपेज › Kolhapur › वाघ दरवाजाजवळील बुरूज ढासळतोय?

वाघ दरवाजाजवळील बुरूज ढासळतोय?

Published On: Jun 15 2018 1:05AM | Last Updated: Jun 14 2018 11:33PMपन्हाळा : प्रतिनिधी

पन्हाळगडावरील वाघ दरवाजानजीकच्या बुरुजाचे दगड निखळू लागले आहेत. बुरुजाची वेळीच डागडुजी केली नाही तर बुरूज कोसळण्याची शक्यताही नाकारता येत नाही. 

किल्ले पन्हाळगडावरील वाघ दरवाजा हे ठिकाण प्रसिद्ध आहे. या वाघ दरवाजातून सुमारे 105 दगडी पायर्‍या उतरून  तबक  उद्यान  बागेत जाता येते. याच वाटेवर वाघ दरवाजाच्या वरचा बुरूज अत्यंत कमकुवत झाला आहे. या बुरुजाचे दगड निखळत आहेत.  बुरुजावर उगवलेल्या झाडाझुडपांमुळे बुरुजाचे दगड सुटू लागले आहेत.

तबक उद्यानात जायला एक मार्ग राजदिंडी परिसरातून  होता, या मार्गावर दोन वर्षांपूर्वी तटबंदीखालील माती कोसळल्यामुळे हा रस्ता पूर्ण बंदच झाला आहे. सध्या बागेत जायला, फक्‍त पायरी वाट असून या पायर्‍यावरील बुरुज धोकादायक झाला असल्याने कधीही ढासळला तरी तबक वन उद्यानात पर्यटकाना जाण्याची वाटच पुर्ण बंद होणार इसे दिसत आहे, पुरातत्व विभाग पन्हाळा विभागाने या ढासळणार्‍या बुरजाच्या दगडाना आहे अशा अवस्थेत टिकवुन ठेवण्यासाठी प्रयत्न  करने गरजेचे आहे, सद्या पावसाळा सुरु झाला आहे, पावसाळ्यात बुरुजाची माती पाण्याने वाहुन जाण्याची शक्यता नाकारता येत नाही व माती वाहुन गेल्याने खिळखिळा झालेला हा बुरुज सुद्धा ढासळला जाणार  हे नक्की आहे.

तबक बागेत पायरी रस्त्यानेच सद्या पर्यटक, व काही ग्रामिण भागातील नागरिक ये -जा करतात, त्याच्यां जिविताला हा बुरुज धोकादायक  आहे, बुरुज ढासळण्या पुर्वि वन खाते, पुरातत्व खाते, व प्रशासनाने तातडिने या ढासळणार्‍या बुरजाला संरक्षित करण्याची पर्यटक व नागरिकातुन मागणी होत आहे.