Thu, Jan 17, 2019 12:12होमपेज › Kolhapur › शिष्यवृत्तीचा विद्यार्थ्यांना लाभ द्या : कवटे

शिष्यवृत्तीचा विद्यार्थ्यांना लाभ द्या : कवटे

Published On: Aug 31 2018 1:39AM | Last Updated: Aug 31 2018 12:43AMकोल्हापूर : प्रतिनिधी

समाजकल्याण विभागाच्या वतीने देण्यात येणार्‍या शिष्यवृत्तीचा लाभ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना द्यावा, अशा सूचना समाजकल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्‍त पी. एस. कवटे यांनी दिल्या. दलित  वस्ती योजनेतून करण्यात येणार्‍या कामाला एकदा मंजुरी दिल्यानंतर त्या कामात कोणताही बदल करून नये, असेही त्यांनी स्पष्ट केले.

समाजकल्याण सहायक आयुक्‍त कार्यालय व जिल्हा परिषद समाजकल्याण विभागाचा आढावा घेण्यासाठी कवटे आज, गुरुवारी कोल्हापूर दौर्‍यावर आले होते. विचारे माळ येथील सहायक आयुक्‍त कार्यालयाचा त्यांनी आढावा घेतला.  

दुपारी जि.प. समाजकल्याण विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. प्रभारी जिल्हा समाजकल्याण अधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी  आजपर्यंत राबविलेल्या योजनांच्या सद्यःस्थितीची माहिती दिली. कवटे यांनी, अचारसंहितेपूर्वी समाजकल्याण आणि अपंग विभागासाठी मिळणार्‍या निधीची रक्‍कम डिसेंबरपर्यंत खर्च करावी, अपंग विभागाची रक्‍कम 3 टक्क्यांवरून 5 टक्के करण्यात आली असल्याचे सांगितले. दलित वस्तीत कामे करताना मंजूर आरखड्यात समावेश असलेलीच कामे करावीत. या आराखड्याला ग्रामसभेचीसुद्धा मंजुरी घ्यावी. त्यामुळे कोणते करण्यात येणार आहे, याची माहिती गावकर्‍यांना कळेल. समाजकल्याण विभागाच्या योजनांना प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी तत्काळ घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी केल्या. बैठकीनंतर अतिरिक्‍त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रवी शिवदास यांची भेट घेतली.