Thu, Sep 20, 2018 02:56होमपेज › Kolhapur › बारावीच्या न तपासलेल्या उत्तरपत्रिकांचे 60 गठ्ठे परत

बारावीच्या न तपासलेल्या उत्तरपत्रिकांचे 60 गठ्ठे परत

Published On: Mar 16 2018 12:45AM | Last Updated: Mar 15 2018 11:16PMकोल्हापूर : प्रतिनिधी

प्रलंबित शैक्षणिक प्रश्‍न व मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित उच्च माध्यमिक शाळा कृती समितीचे बारावी परीक्षा बहिष्कार आंदोलन अद्यापही सुरूच आहे. गुरुवारी (दि.15) विनाअनुदानित शिक्षकांनी बारावी परीक्षेच्या न तपासलेल्या उत्तरपत्रिकांचे 60 गठ्ठे कोल्हापूर विभागीय बोर्ड कार्यालयात जमा केले. यावेळी शिक्षकांनी घोषणाबाजी करीत निदर्शने केली. सीलबंद उत्तरपत्रिकांच्या गठ्ठ्यात भर पडली असून, बारावी परीक्षा निकाल लांबणीवर पडण्याची शक्यता वाढली आहे. 

विनाअनुदानित शिक्षकांचा शासनाबरोबर गेल्या अनेक वर्षांपासून वेतन व अनुदानासाठी संघर्ष सुरू आहे. हे शिक्षक तुटपुंज्या विनावेतनावर काम करीत आहेत. आजपर्यंत 210 शिक्षकांनी केली असून शासनाचे मात्र याकडे दुर्लक्ष आहे. घोषित शाळांच्या अनुदानाबाबत कोणताच निर्णय घेतला नसल्याने विनाअनुदानित शिक्षकांनी बोर्ड परीक्षा कामकाजावर बहिष्कार टाकला आहे. गुरुवारी दुपारी माध्यमिक शाळा कृती समितीच्या पदाधिकार्‍यांनी बोर्डाच्या कार्यालयात एकत्र जमून बारावी परीक्षा उत्तरपत्रिकांचे 50 ते 60 गठ्ठे जमा केले. यावेळी प्रा. रत्नाकर माळी, तानाजी किरुळकर, एकनाथ पाटील, चंद्रकांत कांबळे,  आदी उपस्थित होते.