राज्यही देणार लवकरच पॅकेज : मंत्री हसन मुश्रीफ

Last Updated: May 23 2020 1:22AM
Responsive image


कोल्हापूर : पुढारी वृत्तसेवा 
केंद्र सरकारने घोषित केलेले पॅकेज म्हणजे हे कर्ज स्वरूपातच आहे. त्याचा फायदा होणार नाही, अशी टीका करत राज्य सरकार बारा बलुतेदारांना असे मोठे पॅकेज देईल की डोळे पांढरे होतील, असे सांगत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्य सरकारही लवकरच पॅकेज देणार असल्याचे संकेत दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी ते पत्रकारांशी बोलत होते.

मुश्रीफ म्हणाले, केंद्र सरकारने पॅकेज घोषित केले आहे. मात्र यापैकी बहुतांश रक्‍कम कर्ज स्वरूपातच उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे या पॅकेजचा फायदा होणार नाही. पीएम केअर फंडासाठी मुंबईतून सर्वाधिक निधी गेला. मात्र त्याबदल्यात मुंबईला अवघे 400 कोटी आणि उत्तर प्रदेशला मात्र पंधराशे कोटी देण्यात आले आहेत. हा काय प्रकार आहे, असा सवालही त्यांनी केला.

राज्य शासनाचे केंद्र सरकारकडे जीएसटीचे थकबाकी म्हणून असलेले बारा हजार पाचशे कोटी रुपये आहेत. ते देण्याची राज्य शासनाची मागणी आहे. मात्र त्याबाबत केंद्र सरकार निर्णय घेत नसल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.