Sun, Jun 16, 2019 02:10होमपेज › Kolhapur › प्राथमिक शिक्षक बदली प्रक्रियेत नियोजनाअभावी गोंधळाची स्थिती

प्राथमिक शिक्षक बदली प्रक्रियेत नियोजनाअभावी गोंधळाची स्थिती

Published On: Apr 13 2018 1:17AM | Last Updated: Apr 12 2018 10:37PMसुळकूड : एम. वाय. भिकाप्पा पाटील

राज्यातील जिल्हा परिषदेकडील प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, शिक्षक संघटनांकडून के ल्या  गेलेल्या पद्धतीमधील त्रुटी दूर करण्याची मागणी विचारात घेतलेली नाही. त्यामुळे आजही याबाबत प्राथमिक शिक्षक वर्गातील संभ्रमावस्था कायम आहे. तर बदल्यासंबंधीचे ऑनलाईन  फॉर्म भरण्याबाबत निश्‍चित नियोजन जाहीर न झाल्याने प्रशासकीय पातळीवरही गोंधळसद‍ृश्य स्थिती असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

27 फेब्रुवारी 2017 च्या ग्रामविकास खात्याच्या आदेशानुसार, जि. प. प्राथमिक शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया एन.आय.सी., पुणे येथून सुरू झाली आहे. त्यासाठी संवर्गनिहाय फॉर्म भरण्याबाबत सरल सूचना व्हॉटस् अ‍ॅपद्वारेच कळविली आहे. प्रत्यक्षात मात्र, जि. प. शाळांच्या मुख्याध्यापकांकडे करण्याचे नियोजन या खात्याकडून झालेले नाही. त्यामुळे संवर्ग 1,2 आणि 3 मधील शिक्षकांनी कोणकोणत्या तारखांना फॉर्म भरावयाचे याचे वेळापत्रकच नसल्याने शिक्षकांत संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. गतवर्षी फॉर्म भरण्यासाठी  विभागनिहाय निश्‍चित वेळापत्रक देण्यात आले होते. मात्र, यावर्षी वेळापत्रक देण्यात आलेले नाही.

बदल्यांचे फॉर्म भरण्यासाठी  मुदतवाढ दिली जाणार नाही, असे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे संवर्ग 1 आणि 2 मधील शिक्षक वर्ग फॉर्म भरण्यासाठी धावपळ करताना दिसत आहेत. प्राथमिक शिक्षक समिती या राज्यस्तरीय संघटनेने शिक्षकांच्या मदतीसाठी केंद्र सुरू करण्यात आली आहेत. मात्र, अतिरिक्‍त ठरलेल्या व बदलीपात्र नसणार्‍या शिक्षकांचा फारच गोंधळ उडाला आहे. आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना तर अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.शासनाने शिक्षक बदल्यासंबंधीच्या शंकासमाधानासाठी कोणताही टोल फ्री नंबर सुरू केलेला नाही, त्यामुळे फॉर्म भरताना अडचणी येत असल्याने शिक्षकवर्गात नाराजी आहे. त्यामुळे यावर्षीही शिक्षक बदल्यांचे भवितव्य जर आणि तर यावर हेलकावे खाताना दिसून येत आहे.

Tags : Kolhapur, state, confusion, lack,  planning, primary, teacher, transfer, process