Thu, Jul 18, 2019 10:26होमपेज › Kolhapur › मागासवर्गीय विरुद्ध खुला प्रवर्ग संघर्ष

मागासवर्गीय विरुद्ध खुला प्रवर्ग संघर्ष

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

मागासवगीर्र्य कक्षाकडून पडताळणी करून आणलेल्या शिक्षकांच्या रोस्टरवरून सध्या जिल्हा परिषदेत खुला प्रवर्ग विरुद्ध मागासवर्गीय असा उघड वाद सुरू झाला आहे. खुल्या प्रवर्गातील 397 शिक्षक अतिरिक्‍त ठरत असल्याने या रोस्टरवर खुल्या प्रवर्गाचा राग आहे, तर याच रोस्टरमुळे दहा वर्षांनी का होईना, आपल्याला न्याय मिळाल्याचे मागासवर्गीयांचे म्हणणे आहे. दरम्यान, यावेळी रोस्टरसाठी निवड यादी व नियुक्‍ती आदेशच ग्राह्य धरण्यात आले होते; पण शिक्षण विभागातील जवळपास 500 शिक्षकांची ही यादीच गहाळ झाल्याने सेवा पुस्तिकेवरील जातीच्या आधारे रोस्टर निश्‍चित करण्यात आले आहे. नेमका यावरच अनेकांचा आक्षेप दिसत आहे. 

जिल्हा परिषदेत सरळसेवेने भरती करताना रोस्टरचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर समाजकल्याण आयुक्‍तांकडून जि.प.ला रोस्टर अद्ययावत करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार प्राथमिक शिक्षण विभागाने माहितीचे संकलन सुरू केल्यानंतर 8 हजार 213 पदांपैकी खुल्या प्रवर्गातील 397, तर विशेष मागास प्रवर्गातील 12 पदे अतिरिक्‍त ठरत होती. याउलट, अनुसूचित जाती 180, अनुसूचित जमाती 90, विशेष जाती 37, भटके विमुक्‍त ब 42, भटके विमुक्‍त क 52, भटके  विमुक्‍त 79, इतर मागासवर्गीय 266 अशी पदे रिक्‍त राहत असल्याचे निश्‍चित केले. या रिक्‍त जागानुसार शिक्षण विभागाने विशेष यंत्रणा कामाला लावून शासन निकषांनुसार बिंदू निश्‍चित केले. हे करताना पूर्वीची पद्धत न वापरता निवड यादी व नियुक्‍तीची तारीख एवढाच निकष लावून बिंदू निश्‍चित केले. 

ही माहिती संकलित करताना जवळपास 500 शिक्षकांची निवड यादी व नियुक्‍ती यादी जिल्हा परिषदेच्या अभिलेखा कक्षामध्ये सापडत नसल्याचे आढळून आले. गहाळ झाल्याचे गृहीत धरून या शिक्षकांच्या सेवा पुस्तकाच्या पहिल्या पानावर दिलेल्या जातीच्या उल्‍लेखाचा आधार घेऊन त्यांचे बिंदू निश्‍चित केले गेले. ही यादी सापडली तर, खुल्या प्रवर्गातील येणार्‍या शिक्षकांच्या संख्येत फरक पडू शकतो, असे शिक्षण विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

2013 चे रोस्टरच सदोष

2013 मध्ये मागासवर्गीय असणारा 2017 मध्ये खुला कसा काय, हा खुल्या प्रवर्गाचा वादाचा मुद्दा उपस्थित होत आहे; पण 2013 ची रोस्टर मंजुरी प्रक्रिया ही अधिकृत नव्हतीच. आर्थिक वजन वापरून बिंदू निश्‍चित करून घेतले जात होते, असे या आधीच स्पष्ट झाल्याने फेररोस्टर करण्याच्या सूचना आयुक्‍तांनी शिक्षणाधिकार्‍यांना दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने तब्बल सहा महिन्यांहून अधिक काळ सातत्याने काम करून रोस्टर मंजूर करवून आणले. पुणे येथील मागासवर्गीयकक्षाच्या सहायक आयुक्‍त स्नेहा देवकाते यांच्याकडे सर्व याद्यांची छाननी होऊन अंतिम रोस्टर तयार झाले. यावेळी आलेल्या हरकतींवर केवळ एका बिंदूचीच अदलाबदल झाली होती. उर्वरित कामाचे फेरतपासणी समितीकडून कौतुक झाले होते. 

Tags : Kolhapur, Kolhapur News, roster, open, anger,


  •