Mon, Jun 17, 2019 02:16होमपेज › Kolhapur › बजेटमध्ये श्रीमंत कोल्हापूरचा संकल्प

बजेटमध्ये श्रीमंत कोल्हापूरचा संकल्प

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी  

स्थायी समिती सभापती आशिष ढवळे यांनी शनिवारी महापालिकेचे बजेट सादर केले. 7 मार्चला प्रशासनाने दिलेल्या बजेटमध्ये ढवळे यांनी तब्बल 37 कोटी 39 लाखांची वाढ सुचविली आहे. एकूणच परिवर्तनाच्या समृद्धीतून श्रीमंतीकडे वाटचाल करणारे महानगर असे बजेट त्यांनी सादर केले. म्हणजेच श्रीमंत कोल्हापूरचा संकल्प करण्यात आला आहे. भाजपच्या ढवळे यांनी मांडलेले हे बजेट सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी उपसूचनेसह मंजूर केले. बजेटमध्ये थोडे नवे प्रकल्प असून बहुतांश जुने प्रकल्प पूर्ण करण्याचा संकल्प करण्यात आला आहे. 
 

बजेटमधील ठळक वैशिष्ट्ये :

महापालिकेची प्रशासकीय इमारत

कोल्हापूर महापालिकेची सध्या अस्तित्वात असलेली इमारत प्रशासकीय कामकाजाकरिता अपुरी पडत असल्याने भविष्यातील 50 वर्षांची गरज विचारात घेऊन मैल खड्डा संभाजीनगर या जागेवर नवीन प्रशासकीय इमारत उभारण्याचे प्रस्तावित केले आहे. या इमारतीमधून भारतीय लोकशाही मूल्ये, भारतीय संविधान प्रतिबिंबीत व्हावे असा विचार करून आराखडा बनविणेत आला आहे. इमारत पर्यावरणपूरक बणविणेसाठी अपारंपरिक ऊर्जा स्त्रोत वापरण्यावर भर दिला आहे. प्रस्तावित प्रशासकीय इमारती उभारणीकरिता सुमारे 65 कोटी खर्च येणार असल्याने शासनाकडून निधी प्राप्‍त करून नवीन प्रशासकीय इमारत होण्यासाठी प्रयत्नशील राहीन. त्यासाठी अंदाजपत्रकामध्ये 2 कोटी इतकी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

सर्किट हाऊसजवळ नवीन नाट्यगृह

कोल्हापूरचा सांस्कृतिक इतिहास जतन करण्याचे काम केशवराव भोसले नाट्यगृह व राजर्षी शाहू खासबाग कुस्ती मैदान यांनी केला आहे. या वास्तूचे जतन व संवर्धनाचे काम महापालिका उत्तमरीत्या करत आहे. शहरातील वाढत्या उपनगरांचा विचार करता आणि शहरातील रंगकर्मी, नाट्यप्रेमी, पे्रक्षक यांचेकडून आलेल्या सूचनेनुसार गट नं. 206 शासकीय विश्रामगृह जवळ या प्रशस्त जागेमध्ये एखादे अत्याधुनिक सुख सुविधा युक्‍त नाट्यगृह उभारण्याचा माणस आहे. ज्याच्यामध्ये 2500 बैठक क्षमतेचे सभागृह 350 व 200 क्षमतेची प्रत्येकी ब्लॅक बॉक्स व प्रशासकीय ब्लॉक्स, कॉन्फरन्स हॉल, आर्ट गॅलरी, रेकॉर्डिंग स्टुडिओ, गायन, संगीत, नाट्य प्रशिक्षण संस्था गेस्ट रूम, उपहार गृह तसेच 250 चारचाकी व 500 दोन चाकी वाहनांचे पार्किंग व हब इत्यादींचा समावेश असेल.

बहुउद्देशीय क्रीडा सभागृह

क्रीडा क्षेत्रामध्ये कोल्हापुरातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर उल्‍लेखनीय कामगिरी बजावली आहे. अशा प्रकारे खेळांना प्रोत्साहन देणाच्या द‍ृष्टीने महापालिका क्षेत्रातील मंगेशकरनगर येथे बहुउद्देशीय क्रीडा सभागृहासाठी केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम व खेळ मंत्रालय विभागाच्या खेलो इंडिया  या क्रीडा विकास योजनेंतर्गत बहुउद्देशीय क्रीडा सभागृह पूर्ण करण्याचा माणस आहे. योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार 2 कोर्टचे बॅटमिटन हॉल, बॉक्सिंग रिंग, प्रेक्षकगृह बैठक व्यवस्था फुटबॉल, हॉलीबॉल, बास्केट बॉल इत्यादी खेळांसाठी अ‍ॅस्ट्रो टर्फ युक्‍त इनडोअर स्टेडियम तसेच स्वतंत्र चेंजिगरूम लॉकर्स, स्वच्छतागृह इत्यादी बाबींचा समावेश असेल. याशिवाय विकास आराखड्यातील आरक्षीत असलेली सर्व प्रभागांमधील क्रीडांगणाचा विकास करण्याचा मानस आहे.

प्रधानमंत्री आवास योजना

कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजनेची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी कार्यक्षम तांत्रिक सेल नेमला असून त्यांच्या मार्फत चार प्रकल्प अहवाल शासनास सादर केले आहेत. शहरातील सर्व झोपडपट्टी सर्वेक्षण  पूर्ण झाले असून कदमवाडी, बोंद्रेनगर, सुभाषनगर, कामगार चाळ तसेच शिवाजी पार्क या ठिकाणी आगामी काळात झोपडपट्टीवासीयांना आहे त्या ठिकाणी घरकूल व आर्थिकद‍ृष्ट्या दुर्बल घटकांना किफायतशीर घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील.

रंकाळा संवर्धन रक्‍कम 4.80 कोटी रु.

रंकाळा परिसर येथे नागरिकांना व पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी व रंकाळा तलावाचे संवर्धन व सुशोभिकरण करण्यासाठी विविध विकास कामे करणे गरजेचे आहे. त्याकरिता पर्यटन व सांस्कृतिक विभागाकडून 4 कोटी 80 लाखांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामधील प्राप्‍त 50 लक्ष निधीमधून प्रथम टप्प्यातील संवर्धनाची कामे तत्काळ सुरू करण्यासाठी प्रयत्नशील राहीन. 

Tags : Kolhapur, Kolhapur News, resolution, rich, Kolhapur, budget


  •