Tue, Jul 23, 2019 12:27होमपेज › Kolhapur › चित्रपट महोत्सवाला निधी देण्याच्या प्रश्‍नावर संचालकाचा राजीनामा?

चित्रपट महोत्सवाला निधी देण्याच्या प्रश्‍नावर संचालकाचा राजीनामा?

Published On: Dec 21 2017 1:53AM | Last Updated: Dec 21 2017 12:36AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सहभागी असणार्‍या अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या संचालकाने निधी देण्याच्या कारणावरून महामंडळाच्या संचालकपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. दरवर्षी या महोत्सवाला महामंडळाकडून दीड लाख रुपये दिले जातात; पण यावर्षी दोन लाख रुपये देण्याचा शब्द महामंडळाच्या पदाधिकार्‍याने दिला होता. महोत्सवाची बुधवारी सांगता आहे.

याबाबत निधी देण्याची मागणी महामंडळाच्या अध्यक्षांकडे करण्यात आली; पण नेमके दीड लाख की दोन लाख रुपये द्यायचे यावरून वाद निर्माण झाल्याची चर्चा आहे. याच कारणावरून अखेर या पदाधिकार्‍याने संचालकपदाचा राजीनामा दिल्याची चर्चा आहे. याबाबत महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी महोत्सवाला निधी देण्याच्या कारणावरून कोणत्याही संचालकाचा राजीनामा आला नसल्याचे सांगितले.