होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : रुकडीत कोरोनाग्रस्त सापडल्याने खळबळ

कोल्हापूर : रुकडीत कोरोनाग्रस्त सापडल्याने खळबळ

Last Updated: May 28 2020 8:59AM

संग्रहित छायाचित्ररूकडी : पुढारी वृत्तसेवा

मुंबईवरून हातकणंगले तालुक्यातील रूकडी गावी आलेल्या आणि गावातील विलगीकरण केंद्रात दाखल केलेल्या तरूणाला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे रूकडी गावात जाम टेन्शन वाढले आहे. तर त्याच्या संपर्कात अजून किती जण आले आहेत या प्रश्नावरून रुकडी गावात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले  असून, रात्री १२ नंतर तो रहात असलेले मानेनगर प्रशासनाने सील केले आहे. 

दिवसभरात 1,144 जणांची तपासणी; 177 स्वॅब घेतले

मुंबई वरून गावी (दि. १७ मे रोजी) निघालेल्या या तरूणाला किणी टोलनाका येथे प्रशासनाने ताब्यात घेत कोल्हापूर येथील डी.वाय. पाटील कोविड सेंटर येथे पाठवण्यात आले होते. त्यानंतर त्याला (२० मे रोजी) संस्थात्मक विलगीकरणासाठी संजय घोडावत विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. यानंतर त्याच्यात कोरोनाची कोणतेही लक्षणे दिसली नसल्याने (२१ मे  नंतर) गावातील महात्मा गांधी वसतिगृहाच्या विलगीकरण केंद्रात दाखल केले होते. त्यानंतर दोन दिवसापूर्वी त्याला त्रास जाणवू लागला.

तेव्हा त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठवला असता तो आज पॉझिटिव्ह आला आहे. यावेळी गावातील विलगीकरण कक्षात त्याच्या सोबत अन्य दोघे असल्याचे समजते. तसेच घरातील लोकांनी त्याला जेवण पुरवल्याचेही उघड झाले आहे. याचबरोबर रमजान ईद सणानिमित्त घरातील आईवडील व अन्य कांही अनेक लोकांच्या संपर्कात आल्याची दाट शक्यता आहे. सदर युवकाच्या वडीलांचा गावात  वावर व संपर्क झाल्याने कोणाकोणाशी संपर्क आला याची माहिती घेण्याचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे. दरम्‍यान यामुळे रुकडी गावात सध्या भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रात्री १२ नंतर तो राहत असलेला मानेनगर परिसर प्रशासनाने सील केला आहे. उद्यापासून रूकडी गाव  पूर्णतः  बंद ठेवण्याबाबत निर्णय होणार असल्याचे समजते.