Thu, Apr 25, 2019 11:29होमपेज › Kolhapur › पावसाने झोडपले

पावसाने झोडपले

Published On: May 17 2018 1:27AM | Last Updated: May 17 2018 12:53AMकोल्हापूर : प्रतिनिधी

शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांना बुधवारी रात्री पावसाने झोडपले. जोरदार वारे, विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसाने बहुतांशी ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. झाडे पडणे, तारा तुटण्याच्या प्रकारांमुळे ठिकठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर झाड कोसळल्याने काही काळ वाहतूक विस्कळीत झाली.  फुलेवाडी भागात विजेचा खांब कोसळला.

दुपारी शहर परिसरात ढगाळ वातावरण  झाले. काही भागात जोरदार वारेही सुटले होते. काही ठिकाणी 15-20 मिनिटे पाऊस झाला. रात्री नऊच्या सुमारास शहरात जोरदार पावसाला सुरुवात झाली. पावसाने अनेक रस्त्यांना गटारींचे स्वरूप आले.