Mon, Mar 25, 2019 17:25होमपेज › Kolhapur › पुण्यातील प्रॉपर्टीज्चा खजिना खुला

पुण्यातील प्रॉपर्टीज्चा खजिना खुला

Published On: Sep 02 2018 1:12AM | Last Updated: Sep 02 2018 1:04AMकोल्हापूर : प्रतिनिधी

विद्येचे माहेरघर अशी ख्याती असणार्‍या आणि विविधतेने संपन्‍न पुणे शहराविषयी अवघ्या महाराष्ट्रासह देशभरातील लोकांना आकर्षण आहे. मुलांच्या भवितव्याच्या द‍ृष्टीने स्पर्धेच्या युगात टिकण्यासाठी, त्यांना परिपूर्ण बनविण्यासाठी पुणे महत्त्वाचा पर्याय आहे. यामुळे पुण्यात स्वत:चे घर असावे, अशी प्रत्येकाची इच्छा असते. अशा लोकांना पुण्यातील प्रॉपर्टीच्या विविध पर्यायांची माहिती देणार्‍या प्रदर्शनाचा खजिना शनिवारी खुला झाला. 

दै. ‘पुढारी’ व टोमॅटो एफ.एम. तर्फे हॉटेल पॅव्हेलियनच्या मधुसुदन हॉलमध्ये आयोजित ‘पुढारी पुणे प्रॉपर्टी एक्स्पो 2018’ प्रदर्शनाचे उद्घाटन  महापालिकेचे आयुक्‍त डॉ. अभिजित चौधरी यांच्या हस्ते आणि क्रिडाई कोल्हापूरचे अध्यक्ष महेश यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. यावेळी दै. ‘पुढारी’चे समूह सरव्यवस्थापक अनिल पाटील व रिजनल मार्केटिंग हेड राहुल अभ्यंकर, विभागीय जाहिरात व्यवस्थापक शशिकांत पोवार आदींसह प्रदर्शनात सहभागी बांधकाम व्यावसायिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्व मान्यवरांचे स्वागत अनिल पाटील यांनी केले. हे प्रदर्शन सोमवार (दि. 3 सप्टेंबर) पर्यंत सकाळी 10 ते रात्री 8 या वेळेत बसंत-बहार टॉकीज रोडवरील हॉटेल पॅव्हेलियनच्या मधुसुदन हॉलमध्ये खुले राहणार आहे. 

गेल्या वर्षभरात रेरा, जीएसटीसारख्या उपाययोजनांमुळे रिअल इस्टेट क्षेत्रात चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत चांगली वाढ नोंदवली आहे. परिणामी, या क्षेत्रातील मागणी आणि पुरवठा यांच्यात चांगलीच वाढ झाली. यात प्रामुख्याने परवडणार्‍या घरांचे प्रमाण अधिक वाढले आहे. या संधीचा फायदा अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर बांधकाम व्यावसायिकांनी आपले नवे प्रकल्प लोकांसमोर आणले आहे. दर्जेदार गृहप्रकल्पांतील सदनिका, रो हाऊसेस, बंगलो, फ्लॅट, ओपन प्लॉट आणि व्यावसायिक मिळकती खरेदी प्रदर्शनात करता येणार आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असून, कोल्हापूरकरांनी भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रदर्शनात सहभागी संस्था

प्रदर्शनासाठी कॅनरा बँक ही बँकिंग पार्टनर असून, यात पुण्यातील अभिनव ग्रुप, अमित एंटरप्रायजेस, गोयल गंगा ग्रुप, गेरा, कोहिनूर, कोलते-पाटील, नाईकनवरे, निर्माण डेव्हलपर्स, प्राईड वर्ल्ड सिटी, रोहन बिल्डर्स, शिव असोसिएटस्, युनिक मल्टिकॉन इंडिया, व्यंकटेश बिल्डर्स, अभिनव सिद्धेश रेनबो या संस्थांचा सहभाग आहे.