Wed, May 22, 2019 14:21होमपेज › Kolhapur › कसबा बावडा येथे शिवप्रतिमेची मिरवणूक 

कसबा बावडा येथे शिवप्रतिमेची मिरवणूक 

Published On: Apr 18 2018 1:41AM | Last Updated: Apr 18 2018 12:49AMकसबा बावडा : प्रतिनिधी 

कसबा बावडा येथील विजय स्वतंत्र तरुण मंडळातर्फे मंगळवारी शिवप्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

सकाळी 9.30 वा पन्हाळगडावरून शिवज्योत आगमन झाले. शिव प्रतिमा अभिषेक व प्रतिमा पूजन आ. सतेज पाटील, महापौर स्वाती यवलुजे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पार पडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरसेवक मोहन सालपे होते. त्यानंतर विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या तसेच विविध पदांवर निवड झालेल्या व्यक्‍तींचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर शिवजन्मकाळ सोहळा पार पडला.

यावेळी आयोजित कार्यक्रमात आ. सतेज पाटील म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज यांचा वसा आणि वारसा जपण्याचे काम जयंती सोहळ्या निमित्त विजय स्वतंत्र तरुण मंडळाने केले आहे. दि. 16 रोजी रात्री 8 वा. इतिहास अभ्यासक राजेश पाटील यांचे ‘छत्रपती संभाजीराजे’ या विषयावर व्याख्यान झाले. दरम्यान संयुक्‍त कसबा बावडा, हिंदू एकता प्रणीत प्ले कॉर्नर, शंभुराजे फ्रेंडस् सर्कल, सम्राट मित्र मंडळ, भारतवीर मित्र मंडळ, छ. शिवाजीराजे तरुण मंडळ, संघर्ष मित्र मंडळ, जय शिवराय तरुण मंडळ, फ्रेंडस पॉवर आदी मंडळांनी शिवप्रतिमा पूजन केले.

दिवसभर शाहिरी पोवाड्यांनी परिसर दुमदुमला. सायंकाळी 6 वा. विजय स्वतंत्र तरुण मंडळाच्या शिवप्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली. डॅाल्बीमुक्‍त मिरवणुकीचे उद्घाटन दैनिक ‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक  डॉ. योगेश जाधव, आ. राजेश क्षीरसागर, ऋतुराज पाटील यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते झाले. या मिरवणुकीत सजीव देखाव्यांच्या माध्यामातून इतिहासातील काही प्रसंग, समाजिक प्रश्‍न, पर्यावरण आदी विषयांवर प्रकाशझोत टाकण्यात आला होता.

 

Tags : kolhapur, kolhapur news, KasbaBavda, Shiva Pratima, procession,