Wed, Nov 21, 2018 13:20होमपेज › Kolhapur › 'लोकसभेसाठी मंडलिकांचा झेंडा ठरायचाय'

'लोकसभेसाठी मंडलिकांचा झेंडा ठरायचाय'

Published On: Mar 05 2018 1:42AM | Last Updated: Mar 05 2018 1:42AMभडगाव : वार्ताहर

खचाखच भरलेल्या सुमारे पंचवीस हजार कुस्ती शौकिनांच्या उपस्थितीत अनेक चटकदार कुस्त्या सुरू असतानाच जिल्ह्यातील अनेक राजकीय मंडळींची उपस्थितीही लक्षवेधी होती. निमित्त होते बानगे (ता. कागल) येथे आमदार चषक राष्ट्रीय मॅटवरील कुस्ती स्पर्धेचे. 

लोकसभेचे इच्छुक उमेदवार प्रा. संजय मंडलिक यांनी मैदानावर थेट फेरफटका मारताच निवेदक म्हणाले, संजय मंडलिकांनीही लोकसभेच्या मैदानासाठी तयारी केली आहे; पण झेंडा अजून ठरलेला नाही. अजून एक वर्ष बाकी आहे. आगे आगे देखो, होता है क्या... असे म्हणत असताना प्रा. मंडलिकांनी स्मितहास्य करत उपस्थित प्रेक्षकांना हात जोडत दाद दिली. मैदान कुस्तीचे असले तरी काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते उपस्थित असल्याने प्रा. मंडलिकांच्या लोकसभा उमेदवारीची चर्चा जोरात होती. कुस्ती मैदानासाठी आ. जयंत पाटील, आ. हसन मुश्रीफ, आ. सतेज पाटील, माजी आमदार के. पी. पाटील, ए. वाय. पाटील, हिंदकेसरी दीनानाथसिंह, प्रवीणसिंह पाटील  आदी उपस्थित होते.