Thu, Jun 20, 2019 00:41होमपेज › Kolhapur › दुचाकी चोरीची तक्रार न घेणे पडले महागात

पोलिसालाच ठोकला दंड 

Published On: Dec 21 2017 1:53AM | Last Updated: Dec 21 2017 12:23AM

बुकमार्क करा

इचलकरंजी : प्रतिनिधी

मोटारसायकल चोरीची तक्रार न घेणे गावभाग पोलिस ठाण्याच्या एच. के. बांगर यांना चांगलेच भोवले. कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत जिल्हा पोलिसप्रमुख संजय मोहिते यांनी बांगर यांना एक हजार रुपये दंड सुनावला. 

खंजिरेमळ्यातील सुशांत रानभरे यांची मोटारसायकल चोरीस गेली होती. मोटारसायकल चोरीची तक्रार देण्यासाठी ते गावभाग पोलिस ठाण्यात गेले होते. जनता चौकातून मोटारसायकल चोरीस गेल्यामुळे हे कार्यक्षेत्र शिवाजीनगर पोलिस ठाण्यात येत असल्याचे सांगून बांगर यांनी तक्रारदार रानभरे यांना शिवाजीनगर पोलिस ठाण्याकडे जाण्याचा सल्ला दिला.

वास्तविक, गुन्हा नोंद करून तो शिवाजीनगरकडे वर्ग करणे गरजेचे असताना बांगर यांनी तक्रारदाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा ठपका मोहिते यांनी ठेवला. बांगर यांचे वर्तन अत्यंत बेशिस्त, बेजबाबदार आणि निष्काळजीपणाचे व पोलिस दलातील प्रचलित कायदा व नियमांचा भंग करणारे असल्याचेही मोहिते यांनी नमूद केले आहे.