Wed, Jul 17, 2019 20:44होमपेज › Kolhapur › राधानगरीच्या ऐतिहासिक ‘हत्तीमहाला’ची दुर्दशा

राधानगरीच्या ऐतिहासिक ‘हत्तीमहाला’ची दुर्दशा

Published On: Feb 06 2018 1:46AM | Last Updated: Feb 05 2018 11:56PMराधानगरी : नंदू गुरव 

निसर्गाच्या वरदानामुळे नेहमीच पर्यटकांना खुणावणार्‍या राधानागरी शहरापासुनअवघ्या दोन कि.मी. अंतरावर असणारा ऐतिहासिक शाहूकालीन हत्तीमहाल देखभाल अभावी हाल होत आहेत. दुरुस्ती ,देखभाल अभावी ही वास्तु अखेरची घटका मोजत आहे. राजर्षी शाहूंच्या इतिहासाचा मुक्त साक्षीदार असलेल्या या हत्तीमहालाचे संरक्षण व संवर्धन होणे गरजेचे आहे. मात्र अध्यापही या वास्तूकडे पुरातत्व विभाग, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. 

राधानगरी आणि परिसरावर राजर्षी शाहूंची खास मर्जी येथील घनदाट जंगलात शिकारीच्या निमित्ताने त्यांची वरचेवर ये-जा होती. त्यातच राधानगरी धरणाच्य निर्मिती संकल्पनेनंतर या परिसराला शाहूंचा प्रदीर्घ सहवास लाभला. त्यातूनच पुढे राधानगरी शहराची निर्मिती झाल. राधानागारीपासून धरणाकडे जाणा-या मार्गावर दोन कि.मी अंतरावर शाहू काळात या ऐतिहासिक हत्तीमहालची निर्मिती झाली. हत्तीमहाल म्हणजे हत्ती ठेवण्याची तथा खेळण्याची साठमारी. एकमेकांशी काटकोनात असणा-या भव्य दोन इमारती आणि प्रत्येक कोप-यातील प्रवेश कामानीने एकमेकांशी जोडला गेल्याने आतील बाजूस भव्य चौक असे या इमारतीचे वर्णन आहे. संपूर्ण इमारत दगडी बांधकामातील दुमजली असून तळमजला आणि पहिल्या मजल्यावर लोखंडी पँनेलवर भाजीव विटांच्या सहाय्याने घालण्यात आलेला स्लब त्यावेळच्या वास्तुकलेचा एक आदर्श नमुनाच होय. यापैकी खालील समोरच्या दोन इमारतीमध्ये हत्ती बांधण्यासाठी दोन हॉल असून या इमारतींना छोटी प्रवेशद्वारे आहेत. तर वरच्या मजल्यावर प्रेक्षाग्रह म्हणून वापरण्यात येअत असावे. जाणकार वृद्ध रहिवाशांकडून मिळणा-या माहितीनुसार हा हत्तीमहाल म्हणजे हत्ती बांधण्यासाठी व हत्तीला खेळवण्यासाठी जागा होती. इमारतीमधील चौकात हत्तींना सोडले जावून भाल्याने टोचण्या देवून खेळवले जात होते. चिडलेल्या हत्तींचे चित्कार आणि आपापसातील झुंज हि या खेळाची वैशिष्ठे होती.