Thu, Jan 24, 2019 19:16होमपेज › Kolhapur › प्रलंबित शेतीपंप जोडणी २०१८ अखेर पूर्ण होणार 

प्रलंबित शेतीपंप जोडणी २०१८ अखेर पूर्ण होणार 

Published On: Dec 23 2017 2:05AM | Last Updated: Dec 23 2017 12:44AM

बुकमार्क करा

इचलकरंजी : प्रतिनिधी

कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील प्रलंबित शेती पंप जोडणी पूर्ण करण्यासाठी शासनाने योजना आखली असून मे 2018 अखेर कालबद्ध रितीने सर्व जोडण्या दिल्या जातील, असे आश्‍वासन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर येथे दिले. 

जिल्ह्यातील सर्व आमदारांच्या समवेत झालेल्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते. या बैठकीला आमदार सुरेश हाळवणकर, आ. अमल महाडिक, आ. चंद्रदीप नरके, आ. सत्यजित पाटील, आ. उल्हास पाटील, आ. प्रकाश आबीटकर, आ.डॉ.सुजित मिणचेकर, आ. श्रीमती संध्यादेवी कुपेकर उपस्थित होते. 

जिल्ह्यात नोव्हेंबर 2017 अखेर पायाभूत सुविधा शेतीपंप जोडणी व शेती पंप फक्‍त सेवा जोडणीसाठी लागणारा 87.48 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करावा, आवश्यक मीटरचा पुरवठा त्वरित करण्यात यावा अशी मागणी यावेळी सर्व आमदारांनी केली. यावर मंत्री बावनकुळे यांनी पूर्वीच्या सरकारने एकाच रोहित्रावर प्रमाणापेक्षा अधिक जोडण्या दिल्यामुळे शेतकर्‍यांना अनियमित वीजपुरवठा होत. विद्युत रोहित्र सह कृषी जोडण्या देण्यासाठी महावितरणने मोठी योजना आखली आहे. याबाबत मंत्रिमंडळाचा निर्णय झाल्यानंतर टेंडरची प्रक्रिया होईल. कोल्हापूर जिल्ह्यातील वसुली व गळती अत्यंत कमी असल्याने या योजनेसाठी प्रथम कोल्हापूरची निवड केली आहे.