Tue, Jul 16, 2019 21:48होमपेज › Kolhapur › महिलांना आत्मसंरक्षण प्रशिक्षण घेण्याची संधी

महिलांना आत्मसंरक्षण प्रशिक्षण घेण्याची संधी

Published On: Apr 22 2018 1:16AM | Last Updated: Apr 22 2018 12:57AMकोल्हापूर : प्रतिनिधी

दैनिक ‘पुढारी’ संचलित प्रयोग फौंडेशन हे महिला सबलीकरणाचे ध्येय घेऊन कार्यरत आहे. या अंतर्गत ‘ताराराणी आत्मसंरक्षण प्रशिक्षण’ कोल्हापूर शहरामध्ये राबवण्यात येत आहे. वय वर्ष 14 ते 40 वर्षांपर्यंतच्या मुली व महिला यामध्ये सहभागी होऊ शकतात. रविवार (दि. 29) पासून हे प्रशिक्षण सुरू होत असून याचा कालावधी दोन महिन्यांचा असेल. आठवड्यातून प्रत्येक रविवारी दोन तास हे प्रशिक्षण असेल. प्रयोग फौंडेशनमार्फत हे प्रशिक्षण मोफत असून हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सहभागाचे प्रशस्तीपत्र देण्यात येईल. कोल्हापूर कुराश असोसिएशन व न्यू ज्युदो कराटे प्रशिक्षण केंद्र, हिंदू एकता हॉल, नूतन मराठी विद्यालय परिसर, मिरजकर तिकटी येथे हे प्रशिक्षण देण्यात येईल. या प्रशिक्षणाचा लाभ महिलांनी घ्यावा, असे आवाहन प्रयोग फौंडेशनने केले आहे. प्रवेश मर्यादित असून प्रथम येणार्‍यास प्राधान्य दिले जाईल.संपर्क- मोबा. 9890954545, 9595971616

Tags : Kolhapur, opportunity, women,  take, self, training