Thu, Apr 25, 2019 13:59होमपेज › Kolhapur › ‘सह्याद्री’त वाघांची संख्या वाढणार

‘सह्याद्री’त वाघांची संख्या वाढणार

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या अधिक आहे. हे वाघ सह्याद्री प्रकल्पात स्थलांतरित करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. मुंबईत नुकतीच चांदोलीच्या पर्यटन विकासाबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी याबाबतचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना संबंधित अधिकार्‍यांना दिल्या आहेत. 

दि. 30 जानेवारीरोजी चांदोलीच्या पर्यटन विकासाबाबत चांदोलीत सांगलीचे जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील, आ. शिवाजीराव नाईक यांनी बैठक आयोजित केली होती. या बैठकीला वन, महसूल कृष्णा खोरे महामंडळ, पर्यटन विकास महामंडळ, सार्वजनिक बांधकाम विभाग यासह  अधिकारी उपस्थित होते. येत्या दोन महिन्यात चांदोलीच्या विकासासाठी संबंधित विभाग काय करू शकतो? याचा आराखडा देण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी या बैठकीत दिल्या होत्या. मात्र   बहुसंख्य विभागांनी कोणत्याच हालचाली केल्याचे दिसून न आल्याने आ.  नाईक यांनी मंत्रालयात ही बैठक आयोजित केली होती. 

या बैठकीत चांदोली पर्यटन विकासाबाबत सखोल चर्चा करण्यात आली. पर्यटकांसाठी निवासस्थान,  सर्पोद्यान करण्याची मागणी आ.   नाईक यांनी केली. चांदोली परिसरात कृष्णा खोरे महामंडळाची 300 एकर जमीन सध्या पडून आहे. जलसंपदा विभागाकडे या जमिनीची मागणी करावी, अशा सूचना मंत्री जयकुमार रावल यांनी   दिल्या. 

Tags : Tadoba, Tiger, Chandrapur district, 


  •