Tue, Jul 16, 2019 01:38होमपेज › Kolhapur › अनैतिक संबंधातून महिलेच्या डोक्यात दगड

अनैतिक संबंधातून महिलेच्या डोक्यात दगड

Published On: Apr 18 2018 1:41AM | Last Updated: Apr 18 2018 12:35AMजयसिंगपूर : प्रतिनिधी

अनैतिक संबंध ठेवत नाही या कारणातून चिडून जाऊन येथील श्रद्धा खानावळीत महिलेच्या डोक्यात दगड घालून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या युवराज भगवान माळी (रा. 9 वी गल्ली, राजीव गांधीनगर, जयसिंगपूर) या संशयित आरोपीला येथील प्रथमवर्ग न्यायालयाने चार दिवसाची 21 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

सोमवारी दुपारी 2 ते अडीच वा. दरम्यान संशयित युवराज माळी याने सौ. संजीवनी बाळू मुंजे (वय 45, रा. लाटकर चाळ, जयसिंगपूर) या महिलेच्या डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. सोमवारी रात्री पोलिसांनी माळी याला ताब्यात घेऊन अटक केली होती. आज दुपारी तीन वाजता त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. घटनेत सौ. संजीवनी गंभीर जखमी असून सांगली सिव्हिल रुग्णालयात अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याबाबत संजीवनी यांची मुलगी सौ. दीपाली राजेंद्र हरकळ (वय 27, मूळ गाव नाशिक, सध्या रा. गल्ली नं. 9 लाटकर चाळ, जयसिंगपूर) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरोपी माळी व सौ. संजीवनी मुंजे यांच्यात सोमवारी दुपारी अनैतिक संबंधातून वाद झाला. त्यावेळी माळी याने तू माझ्याबरोबर प्रेमसंबंध ठेवत नाहीस, पैसेही देत नाहीस, तुझे बाहेर कोणाशी तरी अनैतिक संबंध आहेत, असे म्हणून शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व तो निघून गेला. 

मात्र, थोड्या वेळाने तो परत आला. त्यावेळी सौ. मुंजे या स्वयंपाक घरातील फरशीवर झोपलेल्या होत्या. त्यांना जागे करून, तुला जिवंत सोडत नाही, असे म्हणत घराजवळ पडलेला दगड उचलून डोक्यात घातला, असे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी माळी याच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

 

Tags : kolhapur, Jaysingpur news, crime, immoral relations, woman, murder,