Wed, Apr 24, 2019 15:31होमपेज › Kolhapur › शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला!

शिक्षकांअभावी विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला!

Published On: Sep 03 2018 1:39AM | Last Updated: Sep 03 2018 1:39AMकोल्हापूर : प्रवीण मस्के

राज्य शासनाने 2 मे 2012 पासून शिक्षक भरती बंद केल्याने बहुतांश कनिष्ठ महाविद्यालयांमधील शिक्षकांची पदे अद्यापही रिक्‍त असून विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. 

कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर शिक्षक भरतीबंदीनंतर शैक्षणिक दुरवस्था निर्माण झाली आहे. पायाभूत पदे आणि वाढीव पदे असा भेद केला गेला आहे. संचमान्यता प्रक्रियेत ऑफलाईन व ऑनलाईन गोंधळ व सॉफ्टवेअरमधील त्रुटींमुळे अनेक शिक्षकांना अतिरिक्‍त ठरविण्यात आले. 

कोल्हापूर विभागात मागील सहा वर्षांत 1150 पदे रिक्‍त झाली. त्यामधील 450 कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. गणित, विज्ञान व इंग्रजी विषय शिक्षक पदांना काही ठिकाणी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून मान्यता देण्यात आल्या आहेत. सध्या जिल्ह्यातील 268 पदांपैकी 70 पदांना शासनस्तरावरून मान्यता देण्याचा निर्णय झाला असला तरी त्यामध्येही चुका आहेत. शिक्षक संघटनांच्या आंदोलनानंतर उर्वरित 210 उमेदवारांना सामावून घेण्यासंदर्भात शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून मंदगतीने कार्यवाही सुरू झाली आहे. जाहिरातीस मान्यता देणे, नाहरकत प्रमाणपत्राबाबत शासनाचे धरसोडवृत्तीचे  धोरण असल्याने 12 वर्षं सेवा करूनही शिक्षकांना अद्याप मान्यता नाहीत. संस्थेने दिलेल्या तुटपुंज्या वेतनावर शिक्षक हलाखीचे जीवन जगत आहेत. शासन उच्च गुणवत्तेची अपेक्षा करीत असताना भरती प्रक्रियेत सातत्याने बदल केले जात असल्याने संभ्रम वाढल्याचे शिक्षकांमधून बोलले जात आहे.