Thu, Jul 18, 2019 12:37होमपेज › Kolhapur › पीएसआय परीक्षेत कोल्हापूरचा झेंडापीएसआय परीक्षेत कोल्हापूरचा झेंडा

पीएसआय परीक्षेत कोल्हापूरचा झेंडा

Published On: Jun 21 2018 1:36AM | Last Updated: Jun 21 2018 1:15AMकोल्हापूर : प्रतिनिधी

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) 2016 मध्ये घेण्यात आलेल्या पोलिस उपनिरीक्षक (पीएसआय) पदाच्या मुख्य परीक्षेत राज्यात औरंगाबादचा समाधान दौड प्रथम आला. महिला गटातून सांगलीच्या सुप्रिया गायकवाड प्रथम आल्या. या परीक्षेत कोल्हापूरच्या युवकांनीही दमदार कामगिरी केली. पाचगावचे राहुल चंद्रकांत आपटे हे एनटी (ब) प्रवर्गातून राज्यात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. कंदलगाव (ता. करवीर) येथील  उदय विष्णू पाटील हे खुल्या गटातून राज्यात दुसर्‍या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. जयसिंगपूरच्या सोनी सदाशिव शेट्टी महिला गटातून राज्यात तिसर्‍या  आल्या. यासह पूजा कोंडिराम शिंदे या एसटी प्रवर्गातून राज्यात पाचव्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या. शाहूवाडी तालुक्यातील थेरगावमधील चौैघे उत्तीर्ण झाले. यामध्ये पती-पत्नीचा समावेश आहे. एमपीएससीचा निकाल बुधवारी रात्री उशिरा ऑनलाईन जाहीर झाला. एकूण 750 पदांसाठी परीक्षा झाली. उत्तीर्णांमध्ये ग्रामीण भागातील युवक व युवतींचे  प्रमाण लक्षणीय आहे. 

थेरगावमधील चौघे पीएसआय 

थेरगाव (ता. शाहूवाडी) या एका गावातील चारजण पीएसआय परिक्षेत उत्तीर्ण झाले. यामध्ये पती-पत्नीचा समावेश आहे.  सचिन आनंदा रेडेकर, आरती सचिन रेडेकर, शुभांगी बाजीराव रेडेकर, कुमार बाजीराव नाईक अशी उत्तीर्ण झालेल्यांची नावे आहेत. नाईक हे  सध्या पोलिस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत.